एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी स्थिर, पण मनात पुराची धास्ती कायम; राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी 40 फूट 5 इंचावर स्थिर आहे. पुराचे पाणी न कमी झाल्याने जिल्ह्यातील वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. 

Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने महापुराचे टेन्शन तुर्तास मागे सरले, असले तरी मनात धास्ती कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा नदीची कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी 40 फूट 5 इंचावर स्थिर आहे. पुराचे पाणी न कमी झाल्याने जिल्ह्यातील वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे 81 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. 

राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद  

राधानगरी बुधवारी 26 जुलै रोजी 100 टक्के भरल्यानंतर दुपारपर्यंत पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते. त्यामुळे भोगावती नदीपात्रात धरणातून 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता. धरणाचे 3, 4, 5, 6 व 7 स्वयंचलित दरवाजे उघडले होते. यामधील आज (27 जुलै) पहाटे 4 वाजून 24 मिनिटांनी उघडलेल्या एकूण 5 दरवाजांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे गेट बंद झाले. त्यामुळे धरणातून होणारा 8540 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी होऊन 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

राधानगरी धरणातून भोगावती नदीत विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाकडून प्रत्येक बंधाऱ्यावरील पाणीपातळी कटाक्षाने पाहिली जात आहे. पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने पाणी नदीमध्ये आले, तरी फारशी वाढ होणार नसल्याने दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 8 पर्यंत तारळे बंधारा, शिरगाव बंधारा, राशिवडे बंधारा याठिकाणी पाणीपातळीत वाढ झाली असली, तरी हळदी, कोगे आणि राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी स्थिर आहे. त्यामुळे चिंतेची बाब नाही. 

वारणा धरणातून विसर्ग सुरु होणार 

दरम्यान, आजपासून वारणा धरणातून सद्यस्थितीमध्ये सुरु असलेल्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. वक्रद्वारातून 5150 क्युसेक व विद्युत जनित्रमधून 1630 क्यूसेक असा मिळून 6780 क्युसेकने वारणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?

  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
  • कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी
  • हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी, खणदाळ 
  • घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
  • वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
  • कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज 
  • वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची 
  • कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे, 
  • धामणी नदी : सुळे, आंबडे
  • तुळशी नदी : बीड 
  • ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली, कोवाड 
  • दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड, सिद्धनेर्ली, बाचणी 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget