Maharashtra News Updates 17th May 2023 : दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत दिलासा, उद्याची CBI चौकशी रोखली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
BMC : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा, केल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना
Mumbai: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जावा,या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. पूराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले.
उपनगरीय लोकलसेवा सुरळीत सुरू राहावी, याची काळजी घेण्याचे आवाहन
रेल्वे आणि मुंबई पालिकेने मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम काम केल्यानेच उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू होती. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम पद्धतीने काम करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.
यंदा नागरिकांना हवामानाच्या माहितीचे एसएमएस मिळणार
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून पावसाळ्याच्या कालावधीत हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत वेळोवेळी अपडेट्स देणारी मॅसेजची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका एसएमएस ॲपच्या सहाय्याने हे एसएमएस अलर्ट नागरिकांना पाठवण्यात येतील.
APMC Election: नाशिक एपीएमसी निवडणूक प्रकरणी हायकोर्टाची नाराजी, राज्य सरकारला नोटीस जारी
APMC Election: नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीला स्थगिती दिल्याबद्दल पणन खातं सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) ताशेरे ओढले आहेत. यावर राज्य सरकारला नोटीस बजावून एपीएमसीच्या निवडणुका घेण्याबाबत तातडीनं बैठक घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला (एससीईए) दिले आहेत.
कायद्यात तरतूद असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी चुकीचे आदेश पारीत करून निवडणूक प्राधिकरणाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्यापासून रोखलं. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र आहे. निवडून आलेली व्यक्तीला त्यांचा अधिकार वापरण्यापासून प्रतिबंधित करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाच्या आदेशाशिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना अपात्र ठरवता येणार नाही, असं निरीक्षण न्यायमूर्ती अमित बोरकर आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं आपल्या आदेशात नोंदवलं आहे.
Sameer Wankhede: दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत दिलासा, उद्याची CBI चौकशी रोखली
दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडे यांना दिलासा
उद्याची CBI चौकशी रोखली, 22 मेपर्यंत समीर वानखेडेंना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा
मात्र कायमस्वरूपी दिलाश्याकरता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश
तूर्तास कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यास CBI ची सहमती
CBI ची कारवाई कोणत्या आधारावर? माझ्या घरी सर्च ऑपरेशन कां? माझ्यावर अन्याय होतेय
समीर वानखेडेंनी या या मुद्द्यांवर मागितली होती दिल्ली हायकोर्टात दाद
Thane: ठाणे: कंत्राटी नर्सेस यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्यासाठी नर्सेस यांचे ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन
Thane News: कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी नर्सेस यांना पुन्हा आरोग्य सेवेत कायम करण्यासाठी आज ठाण्यात आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने ठाण्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर कंत्राटी नर्सेस यांनी आंदोलन करून जिल्ह्यातील आरोग्य केंद्र सेवेत रुजू करून घ्यावे यासाठी आंदोलन केले आहे. यावेळी आयटक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.
Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बजावली नोटीस
Maharashtra Speaker Rahul Narvekar had given breach of privilege notice against Raut for making objectionable remarks against state Assembly
— Press Trust of India (@PTI_News) May 17, 2023
Gondia News: राखीव वनक्षेत्रात अवैध गट्टू कारखाण्यावर धाड; अग्रवाल ग्लोबल कंपनीचे कोट्यवधींचे साहित्य जप्त, गुन्हा दाखल
Gondia News: गोंदिया जिल्ह्यातील ससीकरण देवस्थान परिसरात राखीव वन क्षेत्रात अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड रायपूर या महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनीने वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता गट्टू बनविण्याचा कारखाना उभारला. त्यात लागणारी यंत्रसामग्री तसेच गट्टू तयार करण्याकरिता लागणारा कच्चा मटेरियल व मजुरांना राहण्याकरिता टिनाचे शेड उभे केले. काही दिवसापासून हा कारखाना अवैधरित्या सुरू असताना सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश जाधव यांनी त्या अवैध कारखान्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत धाड टाकून करोडो रुपयांची यंत्रसामुग्री तसेच रेती, बजरी,गट्टू तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai News: आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र; मुंबई महानगरपालिकेतील लूट आणि रस्ते घोटाळ्याकडे वेधले लक्ष
मुंबई महानगरपालिकेतील लूट आणि रस्ते घोटाळा थांबवण्यासाठी हे पत्र असल्याचे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे .
मुंबई महापालिकेत होणाऱ्या कामांसंदर्भात आक्षेप घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची मागील महिन्यात भेट घेत तक्रार केली होती
आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून पैशाचा अपव्य थांबावा यासाठी राज्यपालांनी लोकायुक्तांकडे याचिका पाठवावी अशी विनंती, आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे