Jalgaon Jashodaben Modi : पीएम मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी जळगावात घेतलं ओंकारेश्वराचे दर्शन, वडाच्या पूजेसह मंदिरात विधिवत आरती
Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या जगन्नाथ रथोत्सवाच्या दर्शनासाठी जात असताना जळगावात (Jalgaon) थांबल्या.
Jalgaon Jashodaben Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी या पुरी येथील जगन्नाथ रथोत्सवाच्या दर्शनासाठी जात असताना जळगावात (Jalgaon) थांबल्या. जळगाव येथील प्रसिद्ध ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन (Mahadeo) घेत पूजेसह त्यांनी अनेक नित्याच्या धार्मिक विधी केल्या. शेवटी जशोदाबेन यांच्या हस्ते कपूर आरती करण्यात येऊन देवस्थानतर्फे सन्मान करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी (Jashodaben Modi) या त्यांच्या खाजगी वाहनाने जगन्नाथ पुरी (Jagganath Modi) येथे यात्रेसाठी जात होत्या. जळगावमार्गे जात असताना जशोदाबेन मोदी यांना जळगावातील (Jalgaon) पुरातन असल्याने ओंकारेश्वर मंदिर देवस्थानबद्दल माहिती होती. त्यानुसार कुठलाही बडेजाव न करता, कुणाला ना माहिती न देता अगदी गोपनीयरित्या जशोदाबेन मोदी यांनी आज ओंकारेश्वर मंदिर देवस्थानला भेट देत याठिकाणी दर्शन घेतले. यावेळी जशोदाबेन यांनी ओंकारेश्वर मंदिरातील (Onkareshwer Mandir) महादेवाला गंगाजल समुद्र जल आणि नर्मदा जलाने भरलेला कलश पुजाऱ्यांना देऊन अभिषेक केला. शेवटी शंकराची कापूर आरती त्यांच्या हस्ते करण्यात येऊन देवस्थान समितीचे जुगल किशोर, आशा जोशी यांनी श्रीफळ देत सन्मान केला.
जशोदाबेन यांचे शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव येथील पद्मालय सर्किट हाऊस (Padmalay) येथील 'रायगड' येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत इतर चार-पाच भाविक होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेजारी असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात त्या पोहोचल्या. तेथे त्यांनी देवस्थानाला भेट जवळपास तासभर मंदिराबाबत चर्चा केली. दररोजच्या नित्यनेमानूसार जशोदाबेन यांनी वडाची पूजा केली. त्याला जल अर्पण करून तुळशी वृंदावन कुठे आहे, अशी विचारणा केली. सोबत आणलेले पाणी तुळशीला अर्पण केले. हे विधी झाल्याशिवाय आपण काहीही खातपित नाही, असे त्यांनी पुरोहितांना सांगितले.
देवस्थानकडून जशोदाबेन यांचा सन्मान
दरम्यान जशोदाबेन मोदी ह्या ओंकारेश्वर मंदिर देवस्थान याठिकाणी आल्याची माहिती पुजारी यांच्या माध्यमातून मंदिर ट्रस्टी पदाधिकारी यांना मिळाली. त्यांनतर मंदिर ट्रस्टी कुटुंबीयांनी जशोदाबेन मोदी यांचा सत्कार केला. त्यानंतर जशोदाबेन मोदी यांच्या हस्ते मंदिरात महादेवाची आरती करण्यात आली. त्यांनतर जशोदाबेन मोदी या जगन्नाथ पुरीच्या यात्रेसाठी मार्गस्थ झाले. जशोदाबेन मोदी यांचा खाजगी दौरा असल्याने मंदिर दर्शनाव्यतिरिक्त त्यांनी कुठेही भेट दिली नाही. मात्र त्यांच्या ही अचानक भेट चर्चेचा विषय बनली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :