PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री इजिप्तच्या राष्ट्रपतींची भेट
अमेरिकेचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून इजिप्तमध्ये आहेत. इजिप्तमध्ये त्यांनी ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल करिम अल्लाम यांची भेट घेतली. आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा केली. शिवाय भारत आणि इजिप्तमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी काहिरामधील हकीम मशिदीत जाणार आहेत. त्यानंतर हेलियोपोलिस कब्रस्तानानाला भेट देतील. पहिल्या जागतिक युद्धात ४ हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यांचं इथं स्मारक आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींनी खास आयोजित केलेल्या मेजवानीत मोदी सहभागी होतील. दरम्यान, याच दौऱ्यात मोदींनी बोहरी समाजाशीही संवाद साधला.























