Eknath Shinde : रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Eknath Shinde Tweet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुथ उद्धव ठाकरेंच्या काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलंय.
Eknath Shinde : रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.... असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी विधानसभेत भाजपा शिवसेना युतीने बहुमत चाचणीत 164 मते मिळविल्यानंतर दिवस गाजवला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. त्यांचे भाषण हा या दिवसातील परमोच्चबिंदू होता. एकनाथ शिंदेंच्या भाषण सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले.
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना.... असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे : एकनाथ शिंदे
काल विधानसभेत एकनाथ शिंदेंनी काल सर्व टीकांवर उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, आपल्याला कुठलीही राजकीय राजकीय पार्श्वभूमी नाही. आमच्या भूमिकेवर टीका करताना आम्हाला भाजीवाला म्हणाले, टपरीवाला म्हणून हिणवले, गाडीवाला म्हणाले, मात्र आम्ही आहोतच ना टपरीवाले. प्रामाणिकपणे व्यवसाय करणे चुकीचे आहे का ? भाजी विकणे चुकीचे आहे का? हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे आहे, भाजीवाल्याचे आहे, टपरीवाल्याचे आहे, रिक्षावाल्याचे आहे. हे सरकार आपले आहे असे प्रत्येकाला वाटेल.
संबंधित बातम्या :