गद्दारांच्या डोळ्यात विकृत हास्य, शिवसैनिकांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच बंडखोर आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला आहे.
मुंबई: एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातले विकृत हासू आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू यातून मला मार्ग काढायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी दिला आहे. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच बंडखोरांचा उल्लेख गद्दार असा केला आहे.
उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांच्यावरती विश्वास ठेऊ नका असं सांगितलं ते अजूनही सोबत आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेऊन मी निवांत होतो त्यांनीच विश्वासघात केला. या सगळ्यातून मी मार्ग काढणार. शिवसैनिकांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची आज शिवसेना भवन येथे बैठक झाली.
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) July 5, 2022
यावेळी उद्धवसाहेबांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. pic.twitter.com/btnjFjrLas
उद्या काय हिसकावतील हे माहिती नाही
उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांसमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिसकावून घेतला. आज माईक हिसकावला, उद्या काय काय हिसकातील हे काही जणांना समजणार नाही.
एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संबंधी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये ते म्हणतात की, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022