एक्स्प्लोर

Aurangabad: अल्पवयीन बहिणीवर अत्याचार, पीडिता सात महिन्याची गर्भवती; नराधम भावास 20 वर्षे सक्तमजुरी

Aurangabad: पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, नराधम भावाने तिला धमकी देत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.

Aurangabad Crime News: घरात कोणी नसताना अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम भावाला जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 46  हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्ह्यातील रकमेपैकी 25 हजार रुपये पीडितेचे उपचार आणि पुनर्वसनासाठी देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात अल्पवयीन पीडितेने पोलिसात फिर्याद दिली होती की, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या 33 वर्षीय भावासह आई-वडिलांबरोबर राहत होती. दरम्यान 2020 मध्ये पीडितेचा भाऊ हा सुरुवातीला पीडितेकडे वाईट नजरेने पाहायचा. पुढे वाईट उद्देशाने पीडितेला स्पर्श करायला लागला. त्यानंतर डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान आरोपी सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असताना दुपारी घरी आला. त्यावेळी आई-वडील घरात नसल्याने अल्पवयीन पीडित मुलगी एकटीच घरात होती. तर घरात कोणीच नसल्याची संधी साधत नराधम भावाने आपल्याच बहिणीवर अत्याचार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, तिला धमकी देत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. 

अशी आली घटना समोर...

अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्यानंतर नराधम भावाची पुन्हा नियत खराब झाली. पहिल्यांदा अत्याचार केल्यावर पुढे आरोपीने पीडितेवर आणखी दोन-तीन वेळा अत्याचार केला. याच काळात पीडितेचे पोट दुखत असल्याने तिला आई-वडिलांनी एका खासगी रुग्णालयात नेले.  यावेळी तिला रुग्णालयात दाखल करताना आरोपीने पीडितेचे वय व नाव चुकीचे नोंदवले. त्याच दिवशी पीडितेने मुलाला जन्म दिला. त्यामुळे बाळाची नोंद करण्यासाठी डॉक्टरांनी पीडितेचे आधार कार्ड मागितले. त्यावेळी दिलेल्या आधारकार्डवरील नाव, पत्ता आणि आधी सांगितलेला नाव पत्ता याच्यात तफावत आढळून आल्याने डॉक्टरांनी सिटी चौक पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. 

डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली...

या प्रकरणात तत्कालीन फौजदार वंदना मुळे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी लोक अभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात डॉक्टरांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर साक्षी पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ज्यात आरोपी भावाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 46  हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली गेली आहे. 

मुलीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न...

आपल्याच भावाने दोन-तीन वेळ अत्याचार केल्याने पीडित मुलीला मोठा धक्का बसला होता. त्यातच ती गर्भवती राहिल्याने तिला याचा मानसिक धक्का बसला. त्यामुळे मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरोपीने आणि मुलीच्या आई-वडिलांनी बाळाचे संगोपन करण्याचं तिला आश्वासन दिल्याने तिने आपला निर्णय बदलला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget