राज्यातील अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय; अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी
राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
![राज्यातील अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय; अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी Maharashtra News A job for a family member if an officer dies while in service CM thackeray took Big decision for state officials राज्यातील अधिकाऱ्यांसाठी मोठा निर्णय; अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/20/b9b297f5e03f98b57ff567fd0da63c37_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोरोना काळात अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले. अधिकारी संघटनांनी देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल देत कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.
संबंधित बातम्या :
ऐतिहासिक निर्णय, भारतीय लष्करात पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांची कर्नलपदी बढती
अमरावतीतील पोलिस अधिकारी अनिल मुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)