एक्स्प्लोर

Nanded News : माळेगाव यात्रेत दूषित पाण्यामुळं घोड्याचा मृत्यू, नांदेड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळं मृत्यू झाल्याचा पशुपालकांचा आरोप 

नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा (Malegaon Yatra) ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध यात्रा असते. या यात्रेत घोड्यांचा मोठा बाजार भरतो. या यात्रेत एका घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Nanded Horse Death News : दरवर्षी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माळेगावमध्ये (Malegaon) श्री क्षेत्र खंडेराय देवस्थानची यात्रा भरते. माळेगावची यात्रा (Malegaon Yatra) ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध यात्रा असते. या यात्रेत घोड्यांचा मोठा बाजार भरतो. यावेळी या यात्रेत दूषित पाण्याचा (contaminated water) प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुषित पाण्यामुळं माळेगाव यात्रेत एका घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळं या घोड्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळं घोड्याचा मृत्यू, पशुपालकांचा आरोप

माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध यात्रा आहे. श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान माळेगाव हे घोड्याचे माळेगाव म्हणून देशभरात सुपरिचित आहे. यावर्षी माळेगांव यात्रेत घोड्याची वाताहात होत आहे. या यात्रेत दोन वर्षांच्या मारवाडी घोड्याचा दूषित पाणी पिल्यामुळं पोट फुगून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घोड्याचा मृत्यू हा नांदेड जिल्हा परिषद ढिसाळ कारभारामुळं झाल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे. जातीवंत, रुबाबदार, महागड्या घोड्याचा अचानकपणे मृत्यू झाल्यानं पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

 घोडे व्यापारासाठी सारंगखेडानंतर माळेगाव प्रसिद्ध

दक्षिण भारतात घोडे व्यापारासाठी सारंगखेडानंतर माळेगाव प्रसिद्ध आहे. घोड्यांच्या व्यापारासाठी अनेक राज्यातून  किंमतीचे जातीवंत घोडे व्यापारी इथे घेऊन येतात. माळेगांव यात्रेत घोडे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तर  काही शौकीन हौशी घराण्याची परंपरा म्हणून घोडा पाळतात. सायळ येथील सरपंच आण्णा पाटील पवार यांनी आपला घोडा खंडोबा यात्रेदिवशी माळेगावमध्ये नेला होता. मात्र, रात्री घोड्याचे अचनकपणे पोट फुगायला लागले. त्यानंतर घोड्यावर तेछील पशूवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. पण उपचारादरम्यान घोड्याचा मृत्यू झाला. 

यात्रेत सुविधा नसल्यानं अश्वपालकांमध्ये चिंतेचं वातावरण

सद्या माळेगाव यात्रेत घोडे, उंट दाखल झाले आहेत. या यात्रेत कोणत्याही प्रकारची सोई सुविधा नसल्यानं घोडे व्यापारासाठी आलेले अश्वपालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. पशुपालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घोड्यास दरोरोज जे खाद्य दिले जाते, तेच खाद्य या ठिकाणी घोड्याला दिले. मात्र पाणी पिल्यानंतर घोड्याचे पोट फुगले आणि घोड्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत घोड्याच्या शवाची प्रयोग शाळेत तपासणी करून  संबधीत यात्रा व्यवस्थापन करणाऱ्या आधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Viral Video : काय सांगता? लोकल ट्रेनमधून घोडा प्रवास करतोय, व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget