Viral Video : काय सांगता? लोकल ट्रेनमधून घोडा प्रवास करतोय, व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही विचित्र फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधला असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही विचित्र फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधला असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या आत एक घोडा दिसत आहे. जिथे एकीकडे लोकांची लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना तारांबळ उडते. दुसरीकडे त्याचवेळी लोकल ट्रेनमध्ये एक व्यक्ती चक्क घोड्यासोबत प्रवास करताना पाहायला मिळतेय. ही व्यक्ती घोडा घेऊन ट्रेनमध्ये चढली. यावेळी लोकल डब्यात उपस्थितांपैकी कुणीतरी व्हिडीओ काढला. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कुठला आहे व्हायरल व्हिडीओ?
लोकल ट्रेनमधील घोड्याचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पश्चिम बंगाल येथील आहे. जिथे सियालदह-डायमंड हार्बर डाउन लोकल ट्रेनमध्ये एक माणूस घोड्यासह ट्रेनमध्ये चढला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घोड्याने पश्चिम बंगालमधील बरईपूर येथे झालेल्या शर्यतीत भाग घेतला होता. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यासह लोकल प्रवास करणे सोयीस्कर मानले. यादरम्यान ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही याला विरोध केला, मात्र त्या व्यक्तीने मनमानी करत घोडा आपल्यासोबत ट्रेनमध्ये नेला.
Video of horse traveling via local train in West Bengal goes viral. #Watch:
— Vijayrampatrika (@vijayrampatrika) April 8, 2022
A video of a #horse traveling via a local train in West Bengal has gone viral online. The incident happened onboard the Sealdah-Diamond Harbor Down local train. pic.twitter.com/r1MjIK4PPQ
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश
हा घोडा दक्षिण परगणामधील बारीपूर येथे एका अश्वारोहण कार्यक्रमातून परतत होता, असे सांगण्यात येत आहे. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही ट्रेनमध्ये घोडा आणण्यास आक्षेप घेतला होता, मात्र घोड्याच्या मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असून लोकांना पाय ठेवण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वेच्या प्रवक्त्यांनी व्हायरल झालेल्या फोटोवरून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. घोड्याचे फोटो आणि व्हिडीओ मिळाल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एकलव्य चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. मात्र ही घटना नक्की कोणत्या स्टेशनवर घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. या संदर्भात चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : ही दोस्ती तुटायची नाय... दिव्यांग मित्राला खांद्यावर घेऊन फिरवतात 'या' मैत्रिणी, व्हिडीओ व्हायरल
- राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनावट! तपासासाठी समिती; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
- Russia Ukraine War : बुचा नरसंहाराचं धक्कादायक वास्तव, चर्चजवळील सामूहिक कबरीत सापडले 67 मृतदेह
- CPCL Recruitment 2022 : नोकरीची सुवर्णसंधी, मोठी भरती; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या शेवटची तारीख
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha