Maharashtra MLC Election |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 143 कोटींची संपत्ती
उद्धव ठाकरे यांच्याकडे 23 लाख 20 हजारांचे तर पत्नीकडे 1 कोटी 35 लाख 20 हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत.
![Maharashtra MLC Election |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 143 कोटींची संपत्ती Maharashtra MLC Election CM Uddhav Thackeray total property Maharashtra MLC Election |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 143 कोटींची संपत्ती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/10213329/Uddhav-Thackeray-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे एकूण 143 कोटी 27 लाखांची संपत्ती आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नावावर 76 कोटी 59 लाख 57 हजार 577 रुपये तर पत्नी रश्मी यांच्याकडे 65 कोटी 9 लाख 2 हजार 791रुपये एवढी मालमत्ता आहे. तर एकत्र कुटुबांची (हिंदू अविभक्त संपत्ती) 1 कोटी 58 लाख 763 रुपये आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे अधिक दागिने असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडे 23 लाख 20 हजारांचे तर पत्नीकडे 1 कोटी 35 लाख 20 हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नावावर 21 कोटींपेक्षा अधिक तर पत्नी रश्मी यांच्या नावावर 33 कोटींपेक्षा अधिक शेअर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतजमीन, निवासी सदनिका, भूखंड अशी मालमत्ता आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन बंगले आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला.
Lockdown 3 | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे काय मागणी केली?लॉकडाऊन वाढवणार की हटवणार?
आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्तीआदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवी आहेत. 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडेसहा लाखांची एक बीएमडब्लू कार आहे. 64 लाख 65 हजारांच्या सोन्याचा यामध्ये समावेश आहे. तर 10 लाख 22 हजार अशी एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)