एक्स्प्लोर

Maharashtra MLC Election | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या चौघांनी उमेदवारी अर्ज भरला

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंसह, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी यांनी अर्ज भरला. कॉंग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.  विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी नऊच अर्ज असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं आता ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झालं आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री अनिल परब, मंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींना संधी

साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.  शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला होता. दीर्घ अनुभव असल्याने त्यांना संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. तर अमोल मिटकरी यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला देखील राष्ट्रवादीने संधी दिली आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या दोघांनीही आज अर्ज भरले. यावेळी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

भाजपकडून डॉ. गोपछडे, दटके, पडळकर , मोहिते पाटील यांनी भरले अर्ज

भाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यांनी 9 मे रोजी आपले उमेदवारी अर्जही भरले. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत तीन ओबीसी आणि एक मराठा नेत्याला संधी देण्यात आली आहे. यामध्ये लिंगायत आणि धनगर समाजाला प्राधान्य देण्यात आलं आहे. नांदेडमधून डॉ. अजित गोपछेडे आणि नागपूरचे प्रवीण दटके ओबीसी आहेत, तर सांगलीतले गोपीचंद पडळकर धनगर नेते म्हणून ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व असलेले रणजितसिंह मोहिते पाटील मराठा नेता आहेत.

भाजपकडून नव्या चेहऱ्यांना विधानपरिषदेवर संधी, का कापला भाजपमधील दिग्गजांचा पत्ता?

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने मराठवाड्यातील दोन नवख्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानं चुरस निर्माण झाली होती. मात्र कॉंग्रेस नेत्यांची मनधरणी करण्यात उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले आणि त्यांच्या एका उमेदवाराने माघार घेतली. कॉंग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget