एक्स्प्लोर

Sharad Pawar Silver Oak Attack : सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा, राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा आरोप

Sharad Pawar Silver Oak Attack : मिटकरी म्हणाले, सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हल्ल्याच्या दिवशी दोन फोन कॉल हे नागपूरवरून आले होते, त्यावरून मास्टरमाइंड नागपूरचाच असल्याचे स्पष्ट होते

Sharad Pawar Silver Oak Attack : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं म्हटलंय. आणखी काय म्हणाले मिटकरी?
 

सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड नागपुरचा

सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हल्ल्याच्या दिवशी दोन फोन कॉल हे नागपूरहून आले होते, त्यावरून मास्टरमाइंड हा नागपूरचाच असल्याचे स्पष्ट होते असं मिटकरी यांनी म्हटलंय. तर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या दोषी नसते तर ते पळून गेले नसते असं देखील मिटकरी यांनी म्हटलंय.

नागपूरच्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅप कॉल 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा युक्तीवाद काल सरकारी वकीलांनी केला. या आंदोलनाआधी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नागपूरच्या एका व्यक्तीशी बोलणं झाल्याचं त्यांच्या चॅटमधून स्पष्ट झालं आहे अशी माहितीही सरकारच्या वतीनं न्यायालयात देण्यात आली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात नागपूरच्या एका व्यक्तीसोबत बोलणं केल्याचं पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं आहे. 6 तारखेला एक मिटींग झाली होती. त्यात हल्ला करण्याचं ठरवलं गेलं. अभिषेक पाटील नावाचा एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. जो आरोपी देखील आहे. काही पत्रकारांना हल्ल्यावेळी बोलवलं गेलं. युट्यूब चॅनलवरील देखील पत्रकार होते. आरोपींचे सदावर्ते यांच्यासोबतचे काही चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख रुपये जमा 
दरम्यान, आरोपींनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. त्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये जमा करण्यात आले असून ही रक्कम 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. ही एवढी मोठी रक्कम गेली कुठे, कशासाठी वापरली, ही रक्कम शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनासाठी वापरली आहे का याचा तपास करायचा आहे असं पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोशManoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget