Sharad Pawar : नेता जर शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो; शरद पवारांचा सदावर्तेंवर नाव न घेता हल्लाबोल
एसटी कर्मचाऱ्यांना जर चुकीचा रस्ता कोणी दाखवत असेल तर त्याला विरोध करणं आपलं काम असल्याचं शरद पवार म्हणाले.
![Sharad Pawar : नेता जर शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो; शरद पवारांचा सदावर्तेंवर नाव न घेता हल्लाबोल Maharshtra Sharad apwar reaction on ST worker protest at NCP leader mumbai house Silver oke Sharad Pawar : नेता जर शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो; शरद पवारांचा सदावर्तेंवर नाव न घेता हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/08/34e7159f236e4c00f0597a32ce8e1289_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कर्मचाऱ्यांना जर चुकीचा रस्ता कोणी दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने सिल्व्हर ओकवर आंदोलन केल्यानंतर त्यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसल्याचं सांगत पवारांनी गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.
शरद पवार काय म्हणाले?
"आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. चुकीचा रस्ता कुणी दाखवत असेल, तर त्या रस्त्याला विरोध करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एव्हढंच मी सांगतो. थोडी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीने तुमच्याभोवती अनेक सहकारी इथे पोहोचले, ते मी माझ्या पाहण्यात होते. त्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हेच तुम्ही दाखवलं."
शरद पवार म्हणाले की, "नेता जर शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसलं. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतभेद असतात, संघर्ष असतात त्यावर टोकाची भूमिका कधीही न घेण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण गेले काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जात होता तो अशोभनीय आहे."
गेली 50 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला उपस्थित
शरद पवार पुढे म्हणाले की, "एसटी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचा गेली 50 वर्षे घनिष्ठ संबंध आहे. त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलेले नाहीत. याच वेळेला काही चुकीचा रस्ता दाखवला आणि कारण नसताना घरदार सोडून एसटी कर्मचारी बाहेर राहीला. त्यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ आली. या संपाचे नेतृत्व ज्यांनी केलं ते यासाठी जबाबदार आहेत."
महत्त्वाच्या बातम्या:
- ST Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध घेणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती
- ST Workers Strike : शरद पवारांच्या घरावर आंदोलन; भाजप नेते अनिल बोंडेंचे चिथावणीखोर वक्तव्य
- Sharad Pawar : माझ्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी, पण तरीही आम्ही चर्चेसाठी तयार; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)