Hanuman Jayanti 2022 : जगातील सर्वात उंच व महाकाय 'हनुमान'! तब्बल 105 फूट मूर्तीची वैशिष्ट्ये, जाणून घ्या इतिहास
Hanuman Jayanti 2022 : आंध्रप्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मुर्तीकाराने ही मूर्ती तब्बल 210 दिवस अथक प्रयत्नातून साकारली आहे.
Hanuman Jayanti 2022 : असं म्हटलं जातं की प्रत्येक गावात काही वैशिष्ट्य असलं की त्या गावाला त्याची ओळख मिळते. काहीसं असंच बुलढाण्यातील नांदुरा या गावाबाबत घडलं आहे. नांदुरा गाव तसं छोटं आहे, पण मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग क्र.06 येथून जाण्यापलिकडे या गावाची ओळख नव्हती, पण आता नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे आणि ती म्हणजे "हनुमान नगरी"! तसेच या गावाजवळ असलेली जगातील सर्वात उंच व विशालकाय हनुमानाची मूर्ती....!
मूर्ती स्थापन्याचा रोचक इतिहास..
जवळपास पंचवीस वर्षाआधी नांदुरा येथील एक कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन गेला असताना त्याठिकाणी एका आंध्रप्रदेशातील व्यापाराला या शेतकऱ्याचा कांद्याचा दर्जा आवडला, त्यावेळी त्याने या शेतकऱ्याला कांदा कुठला अशी विचारपूस केली असता त्याने नांदुरा असं सांगितलं. आंध्रप्रदेशातील शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन याठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचं ठरवलं. मोहनराव हे बलाजींचे भक्त असल्याने त्यांनी याठिकाणी 1999 साली बालाजी ट्रस्ट स्थापन केलं. हनुमान हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी नांदुरा येथे हनुमानाची भव्य व विशालकाय मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय 2020 साली घेतला. त्याकाळी अशी मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च येणार होता , त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातून मूर्तिकार आणून ही मूर्ती घडविली. या मूर्तीच्या बाजूलाच बालाजीचे भव्य असे मंदिरही आहे.
105 फूट उंच मूर्तीचे वैशिष्ट्ये!
आंध्रप्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मुर्तीकाराने ही मूर्ती तब्बल 210 दिवस अथक प्रयत्नातून साकारली आहे. ही 105 फूट उंच हनुमंताची मूर्ती अतिशय सुंदर व सुबक आहे. मूर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेलं टिळक लावलेलं आहे. मूर्तीमध्ये 1 इंच ते 12 इंच साईझ चे जवळपास एक हजार कृत्रिम डायमंड लावलेले आहेत. मूर्तीचे डोळे 27 इंच बाय 24 इंच या आकाराचे असून मानवाचे कृत्रिम डोळे बनविणाऱ्या कंपनीत ते बनविले गेले आहेत. मूर्तीला दररोज जलाभिषेक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मूर्तीला साडे तीन क्विंटलचा हार रिमोट द्वारे चढविण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे, हनुमान हे बालाजींचे भक्त असल्याने शेजारीच कोट्यवधी रुपये खर्च करून बालाजी मंदिर बनविण्यात आलंय. सुंदर अस हे मंदिर आहे.
गिनीज बुक ऑफ लिम्का ने घेतली दखल
एकंदरीत जगातील या उंच व विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची गिनीज बुक ऑफ लिम्का ने सुद्धा दखल घेतली आहे. दररोज याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. आज हनुमान जयंती असल्याने हजारो भक्त याठिकाणी सकाळ पासूनच पूजा अर्चा करण्यासाठी आले आहेत.
मत्वाच्या बातम्या