(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jupiter Transit 2022 : ‘गुरु’च्या संक्रमणास सुरुवात, ‘या’ राशींचं नशीब बदलणार!
Horoscope, 13 April, Jupiter Transit 2022 : राहू-केतू नंतर आता देव गुरुची राशी बदलणार आहे. हा बदल आज होत आहे. ‘या’ राशींवर होणार याचा प्रभाव दिसून येणार आहे. जाणून घ्या...
Jupiter Transit in Pisces 2022 : राहू-केतूची राशी काल बदलली आहे. आता सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू राशी बदलणार आहे, सुमारे 28 तासांनंतर तीन ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याची जागा बदलल्याने देश आणि जगावरही परिणाम होणार आहे.
गुरु संक्रमण 2022 (Jupiter Transit 2022)
13 एप्रिल 2022 रोजी, बुधवारी, 4:57 वाजता, ‘गुरु’ने राशी बदलल्या आहेत. या दिवशी गुरु मीन राशीत संक्रमण करेल. गुरूचे हे संक्रमण मेष ते मीन राशीच्या लोकांवर परिणाम करेल.
गुरुचे महत्त्व
ज्योतिष शास्त्रात गुरु हा ग्रह अतिशय शुभ फल देणारा ग्रह मानला जातो. गुरु हा ज्ञान, अध्यात्म, तीर्थक्षेत्रे, मंदिरे, पवित्र नद्या आणि धार्मिक कार्यांचा कारक मानला जातो. यासोबतच प्रशासन, पोटाशी संबंधित आजार, उच्च शिक्षण आणि उत्पन्नाचा स्रोत यासाठी गुरु ग्रहाचा कारक मानला गेला आहे. जेव्हा, कुंडलीत गुरु शुभ असतो, तेव्हा असे लोक विद्वान, श्रीमंत आणि आदरणीय असतात. ‘गुर’ ग्रहाला देवांचा गुरु असेही म्हणतात.
बृहस्पति परिवर्तनामुळे ‘या’ राशींना होणार फायदा!
ज्योतिष शास्त्रात ‘गुरू’ला धनु आणि मीन राशीचा स्वामी म्हटले आहे. या राशींसाठी गुरूच्या राशीतील बदल कसा असेल, जाणून घेऊया...
धनु : गुरूचे हे संक्रमण तुमच्यासाठी काही बाबतीत आव्हाने आणि अडथळे आणू शकते. पण यानंतरही गुरूचे हे संक्रमण तुम्हाला काही बाबतीत अत्यंत अशुभ परिणाम देणार आहे. आजपासून गुरु तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे भावंड, मित्र इत्यादींशी संबंध दृढ होतील. संवाद, लेखन, वकिली, पत्रकारिता, सल्लामसलत यासारख्या कामाशी संबंधित असलेल्यांना लाभ मिळू शकतो. नोकरीत प्रमोशनही मिळू शकते. व्यवसायात लाभाची स्थिती देखील असू शकते. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. परदेशातील संपर्कातून लाभ मिळेल. घर आणि वाहन खरेदीचीही शक्यता आहे.
मीन : गुरूचे संक्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. त्यामुळे त्याचा सर्वाधिक प्रभाव मीन राशीच्या लोकांवरच दिसून येईल. या काळात खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कर्ज इत्यादीपासून मुक्ती मिळू शकते. जर तुम्ही दीर्घकाळ परदेशात जाऊ शकत नसाल, तर तुम्हाला या ट्रांझिटमध्ये संधी मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या कौशल्याने आणि क्षमतेने इतरांना प्रभावित कराल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील, विवाहातील अडथळेही दूर होतील. या काळात गैरकृत्यांपासून दूर राहा. अन्यथा गुरू शिक्षाही करू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
हेही वाचा :