Maharashtra Breaking News LIVE Updates : अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Corona Vaccination Drive 1 Year Completed : देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.
देशात कोविड लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत देशात एकूण 156 कोटी 68 लाख 14 हजार 804 जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.
देशातील आतापर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी
Petrol-Diesel Price Today 16 Januvary 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे लेटेस्ट दर जारी केले आहेत. देशभरात आज म्हणजेच, 16 जानेवारी 2022 रोजीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशांतर्गत पातळीवर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यानंतरही महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश यांच्यासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटर पार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. याशिवाय अन्य महानगरांतही किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त
अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
आरोपी विशाल फटे शासकीय रुग्णालयात
बार्शीतील फटे स्कॅम प्रकरणाती मुख्य आरोपी विशाल फटेला अटक झाली असून आता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं आहे.
चंद्रकांत बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्याविरोधात पोलिसांत दाखल केली तक्रार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.
बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे पोलिसांत हजर
बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे पोलिसा स्थानकात हजर झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात विशाल फटे स्वतःहून हजर झाला आहे. कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी विशाल फटे हा मुख्य आरोपी आहे.
उत्तरप्रदेशातील ओबीसी नेते बाबूसिंह कुशवाह यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली
उत्तरप्रदेशातील ओबीसी नेते आणि जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष बाबूसिंह कुशवाह यांनी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेतली. उत्तरप्रदेश येथे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात उभयतांमध्ये चर्चा झाली. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मते ही निर्णायक ठरणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.