एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; 'या' राज्यात 26 जानेवारीपासून पेट्रोलवर सबसिडी

Petrol-Diesel Price Today 16 Januvary 2022 : आजही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Price Today 16 Januvary 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे लेटेस्ट दर जारी केले आहेत. देशभरात आज म्हणजेच, 16 जानेवारी 2022 रोजीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशांतर्गत पातळीवर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यानंतरही महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश यांच्यासह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटर पार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. याशिवाय अन्य महानगरांतही किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रतही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

झारखंडमध्ये 26 जानेवारीपासून पेट्रोल-डिझेलवर मिळणार सूट 

झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राशन कार्ड धारकांसाठी 26 जानेवारी 2022 पासून एका ठराविक मर्यादेपर्यंत प्रति लिटर पेट्रोलवर 25 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री सोरेन यांनी 26 जानेवारीपासून गरिबांना पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर 25 रुपये अनुदान देण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील शिधापत्रिकाधारक दुचाकी चालकांना पेट्रोल खरेदीवर प्रतिलिटर 25 रुपये सवलत देण्याची योजना 26 जानेवारीपासून राबविण्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

देशात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठल्या शहरात? 

देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या (VAT) वेगवेगळ्या दरांमुळे राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल (Petrol) 112 रुपये प्रति लिटर आहे. महानगरांबाबत बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Rate) सर्वात स्वस्त आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या किमतींमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. दिल्ली व्यतिरिक्त इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलनं शतक पार केलं आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशातील महानगरांतील आजचे दर :

देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Bus Accident : भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
OTT Upcoming Release 2025: अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
अॅक्शन-ड्रामा अन् बरंच काही; नव्या वर्षात मनोरंजनाची मेजवानी, नुसतं एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट आणि एन्टरटेन्मेंट
Embed widget