Maharashtra Breaking News LIVE Updates : बुलढाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, पाहा आजची ताजी आकडेवारी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Goa Election 2022 : आगामी काळात पाच राज्याच्या निवडणुका (Assemnbly Election 2022) होऊ घातल्या आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) तयारी सुरु केली आहे. शिवसेना (Shiv Sena) गोव्यासह उत्तरप्रदेशमध्ये निवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत पण शिवसेनेला आतापर्यंत फारसं यश आलं नाहीय.आता शिवसेना काय तयारी करत आहे? कशी निवडणुक लढवणार? याबद्दलची सर्वांनाच उत्सुकता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवण्यासाठी प्रयत्न केले पण अद्याप त्यांना यश आले नाही, गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जमवून घ्यायला तयार नाहीय तर दुसरीकडे काँग्रेसला शिवसेनेबद्दल सॅाफ्ट कॅार्नर दिसतोय. कारण गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा शिवसेनेला सोबत घेण्यात इच्छुक असल्याची माहिती मिळतेय. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रावादीनं प्रत्येकी 4-4 जागा मागितल्या होत्या त्यापैकी शिवसेनेला 3 जागा मिळत असल्याची माहिती आहे. पण हिंदुत्त्ववादी विचारसरणी असलेली शिवसेना 3 जागांसाठी गोव्यात काँग्रेससोबत जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार असल्यानं गोव्यातही सेम फॅार्म्युला वापरायचा होता पण कॅाग्रेसनं राष्ट्रवादीला जागा न दिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन प्रादेशिक पक्ष गोव्यात एकत्र येऊ शकतात.
Nagpur Crime News : नागपूर रेल्वेला मोठा चुना लावणारा अटकेत; एक, दोन नव्हे तब्बल 55 नळ जप्त
Nagpur Railway Crime : रेल्वे गाडीच्या स्वच्छतागृहात गेल्यावर नळाची तोटी नसल्यानं पाईपमधून वाहतं पाणी पाहून आपण रेल्वे प्रशासनासह सरकारला पोटभरून शिव्या देतो. मात्र, नागपुरात रेल्वेतील नळाच्या तोट्या गायब असल्यामागे सरकार नव्हे तर तुमच्या आमच्यातले काही सिकंदर कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या स्वच्छतागृहातून नालाच्या तोट्या चोरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 55 नळ जप्त केले असून त्याने आजवर शेकडो नळ चोरून रेल्वेला मोठा चूना लावल्याची माहिती समोर आली आहे.
आधी चोर फक्त सोने चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरायचे. मात्र, आता आपल्या वाईट सवयी भागवण्यासाठी नवखे चोर मिळेल ती वस्तू लंपास करतात. त्यामुळे अंमली पदार्थांची सवय असलेले चोर कधी काय आणि कोणती वस्तू चोरतील याचा नेम नाही. अशाच एका चोराला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या चोराने चक्क रेल्वे गाडीतील नळ चोरले होते. सिकंदर जहीर खान असे त्याचे नाव असून सिकंदर नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर कोचच्या स्वच्छतागृहातील नळ तोट्या चोरी करायचा. चोरलेल्या नळ तोट्या विकून मिळणाऱ्या पैशातून सिकंदर त्याचे अमली पदार्थांचे व्यसन पूर्ण करायचा.
परभणीत जोरदार पाऊस
शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले काही चेहरे शिवसेनेच्या तिकिटावर उत्तर प्रदेशात लढण्याची शक्यता
शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले काही चेहरे शिवसेनेच्या तिकिटावर उत्तर प्रदेशात लढण्याची शक्यता
संजय राऊत राकेश टिकैत यांच्या मुजाफरनगर भेटीत याबाबत खलबतं
निवडणुकीत टिकैत उघडपणे राजकीय भूमिका घेण्याची शक्यता कमी, पण पडद्याआडून सूत्र हलवणार
शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेली एक राजकीय संघटनाही शिवसेनेच्या संपर्कात
मुजफ्फरनगरनंतर संजय राऊत लवकरच लखनौ, मथुरेचाही दौरा करणार
दत्तात्रय वारे यांचा अर्ज फेटाळला
पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीतील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आलय. दत्तात्रय वारे यांनी या निलंबनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची दत्तात्रय वारे यांची मागणी फेटाळून लावलीय आणि दत्तात्रय वांरेना 19 आणि 20 जानेवारीला चौकशी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत.
मुंबईत दुकानांवरील मराठी पाट्यासांठी शिवसेना रस्त्यांवर....
राज्य मंत्री मंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरांत नावं लिहीण्याचे आदेश जाहीर केलेत. मात्र या आदेशांना मुंबई ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा याने विरोध करत आदेशांचे पालन करणार नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट विरेन शहा याच्या मालकीच्या रूपम शाँप समोरच मोठे बँनर लावलेत. बँनर वर महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच
दहा कामगारांपैक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
हे आपले ठाकरे सरकार
असा मजकूर छापण्यात आलांय. मुंबई पेलिस मुख्यलयासमोरच विरेन शहा यांच्या मालकीचे रूपम शाँप आहे. त्या शाँपच्या शेजारीच असे बँनर शिवसेनेनं लावलेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरून वाद निर्माण होताना दिसतोय.
कारमध्ये ठेवलेले आठ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लांबवले..
बीड जिल्ह्यातल्या गेवराईत एका व्यापार्याने आपल्या कारमध्ये ठेवलेले आठ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लांबवल्याची घटना घडली आहे.. गेवराई मध्ये राहणारे भीमा नरोटे हे कापसाचा व्यवसाय करतात आपल्या व्यवसायातून आलेले पैसे त्यांनी आपल्या गाडीत ठेवले होते व ते आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सेवालाल नगरमध्ये आले असता अज्ञात चोरट्यांनी या गाडीच्या काचा फोडून हे आठ लाख रुपये लांबवले आहेत याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत