एक्स्प्लोर

Goa Election 2022 : गोव्यात काँग्रेसची शिवसेनेला 3 जागांची ऑफर तर राष्ट्रवादीला जागा सोडण्यात काँग्रेस अनुत्सुक 

Goa Election 2022 : शिवसेना (Shiv Sena) गोव्यासह उत्तरप्रदेशमध्ये निवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत पण शिवसेनेला आतापर्यंत फारसं यश आलं नाहीय.आता शिवसेना काय तयारी करत आहे?

Goa Election 2022 :  आगामी काळात पाच राज्याच्या निवडणुका (Assemnbly Election 2022) होऊ घातल्या आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) तयारी सुरु केली आहे. शिवसेना (Shiv Sena) गोव्यासह उत्तरप्रदेशमध्ये निवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत पण शिवसेनेला आतापर्यंत फारसं यश आलं नाहीय.आता शिवसेना काय तयारी करत आहे? कशी निवडणुक लढवणार? याबद्दलची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवण्यासाठी प्रयत्न केले पण अद्याप त्यांना यश आले नाही, गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जमवून घ्यायला तयार नाहीय तर दुसरीकडे काँग्रेसला शिवसेनेबद्दल सॅाफ्ट कॅार्नर दिसतोय.  कारण गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा शिवसेनेला सोबत घेण्यात इच्छुक असल्याची माहिती मिळतेय. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रावादीनं प्रत्येकी 4-4 जागा मागितल्या होत्या त्यापैकी शिवसेनेला 3 जागा मिळत असल्याची माहिती आहे. पण हिंदुत्त्ववादी विचारसरणी असलेली शिवसेना 3 जागांसाठी गोव्यात काँग्रेससोबत जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार असल्यानं गोव्यातही सेम फॅार्म्युला वापरायचा होता पण कॅाग्रेसनं राष्ट्रवादीला जागा न दिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन प्रादेशिक पक्ष गोव्यात एकत्र येऊ शकतात.  

महाराष्ट्राबाहेरची शिवसेना… 
श्रीमंत डेलकर यांच्या रुपानं राज्याबाहेर खासदार मिळाला असला तरी आतापर्यंत शिवसेनेचा राज्यबाहेरचा निकाल फारसा चांगला नाहीय. युपी बिहार गोव्यासह अन्य राज्यात शिवसेना निवडणुक लढली आहे पण  त्यात यश आलेलं नाहीय, काही ठिकाणी डिपॅाजिट जप्त झालं असल्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी शिवसेनेला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झालं आहे. पण गेल्या काही काळापासून शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर आपलं जाळं परसवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्याच्या दृष्टीनं शिवसेना एक एका राज्यात आपले पाय रोवत आहे. राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा प्रसार व्हावा यासाठी हे प्रयत्न आहेत.

राऊतांची भूमिका काय? 

गोवा आणि अन्य राज्यात शिवसेना निवडणूक लढणार का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ‘नक्कीच आमचा गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु आहे. गोवा, उत्तर प्रदेश पंजाबमध्ये इतर मोठे पक्ष आहेत. ते नक्कीच चांगली तयारी करत आहेत. त्यांचा प्रचार, बॅनर, होर्डिंग दिसत असतील. तसं काही शिवसेनेचं दिसत नसेल पण शिवसेनेचा विचार आणि भूमिका लोकांपर्यंत जात असते. आमचे कार्यकर्ते निवडणुका लढवत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे’, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे यातून स्पष्ट झाले शिवसेना कशाप्रकारे या निवडणुका लढवणार आहे. देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा  बिगुल वाजलय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानं शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष होतं पण अद्याप शिवसेनेची भूमिका स्पष्ट झालेली नाहीय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये  शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच शिवसेनेने केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

काय तयारी ? आणि  कशी निवडणुक लढवणार ? 
 महाराष्ट्र सरकारची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे सर्व निवडणुकांची जबाबदारी सध्या आदित्य ठाकरे सांभाळत असताना दिसत आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका आदित्य ठाकरेंच्याच नेतृत्त्वाखाली लढवल्या जाणार आहेत. युपी आणि गोव्यातल्या उमेदावरांमध्ये जोश भरण्याचं काम आदित्य ठाकरे करणार आहेत. तसेच शिवसेना राज्यातल्या खासदारांना विविध मतदारसंघात जबाबदारी देणार आहे, उत्तर भाषिक नेत्यांवर जास्तीत जास्त मदार सोपवण्यात आलीय. त्यामुळे शिवसेना आपला पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त ताकद उत्तर प्रदेश आणि गोव्यात लावणार आहेत.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावाAmravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget