एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : सावरकर नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 34 जणांना चावा

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : सावरकर नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 34 जणांना चावा

Background

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

ग्रँड हयातमधील पार्टीत सारा अली खान, सारा तेंडुलकरसह 'ही' दिग्गज मंडळी, आयोजकांवर कारवाई
मुंबई : मुंबईतल्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये कोरोनाचे  नियम धाब्यावर बसवत, कॅनेडियन रॅपर एबी ढिल्लोनच्या गाण्यावर तरुणाई थिरकली होती आणि कोरोनाला गर्दीमध्ये चिरडणाऱ्यांमध्ये बॉलिवूडची स्टार मंडळी आघाडीवर होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधल्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, प्रसिद्ध होस्ट शिबानी दांडेकर, तसंच सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही मंडळी हजर होती. त्यांना कॅमेऱ्यानं कैद केलं आहे. या कार्यक्रमात अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगची देखील ऐशीतैशी करण्यात आली.  खरं तर सेलिब्रिटींना तरुणाई फॉलो करते. सेलिब्रिटींनी कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावावी हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं ही स्टारमंडळी टीकेचे धनी ठरताहेत.. दरम्यान कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याप्रकरणी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे.  लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित केलेल्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन, प्रकरण असं घडलं...
 
आरोग्य विभागा पाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आले आहे. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते.  औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. 

23:20 PM (IST)  •  13 Dec 2021

खासदार राहुल शेवाळे यांना पितृशोक

खासदार राहुल रमेश शेवाळे साहेब यांचे वडील श्री.रमेश शेवाळे यांचे आज सायं.७.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.

21:17 PM (IST)  •  13 Dec 2021

देवस्थान जमीन प्रकरणात आता देवेंद्र फडणवीसांचे बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र

आष्टी तालुक्यातही देवस्थान जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्या नंतर आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एन्ट्री केली आहे. एसआयटीकडे केवळ विशिष्ट प्रकरनेच न देता बीड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वक्फ आणि देवस्थान जमिनीचे हस्तांतरण झाले आहे, त्या सर्व प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी तसे पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून यात तब्बल ३२ जमिनींचा उल्लेख करण्यात आला आहे.

21:12 PM (IST)  •  13 Dec 2021

सावरकर नगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 34 जणांना चावा

ठाण्यातील सावरकर नगर, म्हाडा आणि पाटीलवाडी भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सकाळ पासून सुमारे 34 जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. यात तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. या कुत्र्याला पकडण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी पाचरण करण्यात आली असली तरी देखील तो सांयकाळपर्यंत सापडला नव्हता. ठाणे महानगरपालिकेच्या पशु विभागाला तक्रार देऊन डॉग व्हॅन आणण्यात आली होती. मात्र तरीही कुत्रा त्यांच्या जाळ्यात सापडत नव्हता. अखेर संध्याकाळी साडे सातनंतर या कुत्र्याला पकडण्यात यश आले. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील प्रयत्न केले. या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत.

19:33 PM (IST)  •  13 Dec 2021

राज ठाकरे औरंगाबादेत दाखल.. मनसैनिकांनी केले ढोल ताशांच्या गजरात स्वागत

राज ठाकरे औरंगाबादेत  दाखल.. मनसैनिकांनी केले ढोल ताशांच्या गजरात स्वागत .उद्या दिवसभर राज ठाकरे आहेत औरंगाबाद दौऱ्यावर.मराठवाड्यातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार.21 महिन्यानंतर राज्य औरंगाबादेत..

राज ठाकरेंचे स्वागत अन् शहरवासीयांना मनस्ताप..

औरंगाबादेत महावीर चौकात सायंकाळी पाच वाजेपासूनच मनसैनिक  राज ठाकरे यांच्या स्वागताला उपस्थित होते. ढोल, ताश्यासह चौकाचा एक कोपरा व्यापला होता. वाळूज औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या कामगार वर्गाची मात्र मोठी कोंडी झाली. याचवेळी वाहतुक सिग्नल बंद असल्याने पोलिसांवर मोठा ताण निर्माण झाला. तब्बल जवळपास अडीच तास शहरवासीयांना हा मनस्थाप सहन करावा लागला..

18:50 PM (IST)  •  13 Dec 2021

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10 जवान जखमी

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या  हल्ल्यात 10 जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Mutual Fund SIP : शेअर बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदारांनी म्युच्यूअल फंडावर विश्वास दाखवला, डिसेंबरमध्ये 26000 कोटींची गुंतवणूक
बाजार अस्थिर असताना देखील गुंतवणूकदार खंबीर, SIP वर विश्वास, डिसेंबरमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक, आकडेवारी समोर
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines :  टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 Jan 2025 : ABP MajhaSoybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special ReportFatima Shaikh Savitribai Phule : सावित्रीबाईंची सखी सत्य की कल्पित? Special ReportTorres Scam Mumbai : मुंबईत भाजीवाल्याचे 14 कोटी बुडाले, टोरेसनं फसवलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Mutual Fund SIP : शेअर बाजार अस्थिर असताना गुंतवणूकदारांनी म्युच्यूअल फंडावर विश्वास दाखवला, डिसेंबरमध्ये 26000 कोटींची गुंतवणूक
बाजार अस्थिर असताना देखील गुंतवणूकदार खंबीर, SIP वर विश्वास, डिसेंबरमध्ये 26 हजार कोटींची गुंतवणूक, आकडेवारी समोर
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
Embed widget