Maharashtra Breaking News 30 June 2022 : राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jun 2022 08:52 PM
Aurangabad: संजय शिरसाट,अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांकडून जल्लोष

Maharashtra New Govt: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनतर शिंदे गटात आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी आतिषबाजी करत मिठाई वाटप करण्यात आली.




Aurangabad: आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 42 रुग्णांची वाढ

Aurangabad Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नवीन 42 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यात ग्रामीण भागातील 14 रुग्ण तर 28 रुग्ण शहरातील आहे. तर 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. ज्यात 5 रुग्ण ग्रामीण भागातील असून,13 रुग्ण शहरातील आहे. तर 171 रुग्ण सक्रिय आहे. ज्यातील 153 रुग्णांना कोणतेही गंभीर लक्षणे नसल्याने ते घरीच उपचार घेत आहे.

मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक सुरळीत : मध्य रेल्वे

सकाळपासूनच मुंबईत तुफान पाऊस सुरु आहे. सीएसएमटी, दादर, भायखळा, कुर्ला या ठिकाणी जोरदार मध्ये पाऊस सुरू आहे. तरी सर्व लोकल योग्यपणे सुरु आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे पीओरओ यांनी दिली आहे.


 





पुणे : न्यायालय परिसरात थुंकणं पडलं महागात; अख्खा मजला पुसून काढावा लागला

जुन्नरच्या न्यायालयाच्या इमारतीत थुंकणाऱ्या तरुणाला संपूर्ण मजला साफ पुसण्याची शिक्षा करण्यात आली. न्यायमूर्ती अभय ओक यांनी न्यायालयाचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी भावना व्यक्त केली. जुन्नर येथे न्यायालयाच्या नव्याने विस्तारित इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यासंदर्भात जुन्नर न्यायालयाची नवीन बांधण्यात आलेली इमारत स्वच्छ ठेवावी, तसेच जे अस्वच्छ आहेत व पायाभूत सुविधांची स्वच्छता ठेवत नाहीत त्यांच्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. नव्याने बांधण्यात आलेली जुन्नर न्यायालयाची इमारत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आकर्षण ठरली आहे. या इमारतीत दर्जेदार बांधकाम, न्यायालयीन प्रशासन, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार, नागरिकांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

मुंबईतील कुर्ला इमारत दुर्घटनेवर CM योगींकडून शोक व्यक्त

बईतील कुर्ला येथे दोन दिवसांपूर्वी नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत दुर्घटनेमध्ये  एकूण 19 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे,. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून यापूर्वी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडूनही 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्यांपैकी काही यूपी-बिहारमधीलही होते. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

Rupee Vs Dollar:  अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपया वधारला असल्याचे दिसून आले. रुपया डॉलरच्या तुलनेत 13 पैशांनी वधारत 78.90 रुपये प्रति डॉलर या किंमतीवर खुला झाला आहे. इंटरबँक फॉरेन करन्सी बाजारात रुपयाने  78.90 रुपयांचा स्तर गाठला. मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया 79.03 रुपयांच्या नीचांकी स्तर गाठला होता. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पॅन कार्ड आधारशी लिंक केलं? आजच करा, नाहीतर भरावा लागेल 1000 रुपयांचा दंड

PAN-Aadhaar Linking Penalty : तुम्ही तुमचं पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डला (AADHAAR) लिंक केलंय का? केलं नसेल तर, लगेच करा. कारण आज शेवटची तारीख आहे. आज जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाहीतर मात्र दुप्पट दंड भरावा लागणार आहे. दुप्पट दंड यासाठी कारण पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची UIDAI नं दिलेली मुदत 31 मार्च होती. पण त्यानंतर 500 रुपयांच्या दंडासह 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. पण तरिही कोणी आधार आणि पॅन लिंक केलं नाही, तर मात्र त्यांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

नाशिक : इग्नू विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांना विद्यावेतनासह नोकरीही मिळणार

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातून कमवा व शिका योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. यामुळे अनेक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आपले शिक्षण पूर्ण करीत असतात. याच धर्तीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून आणि जिल्ह्याबाहेरील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेता येत नाही. वसतिगृह, जेवणाखाण्याचे व शैक्षणिक शुल्क कसे भरायचे, या सारखे अनेक प्रश्‍न पालकांसह विद्यार्थ्यांपुढे उभे राहतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेल्या कमवा आणि शिका योजनेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हे प्रश्न काही अंशी सुटले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2022-23 या वर्षांपासून 'कमवा आणि शिका' ही ज्ञान कौशल्यावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक योजना राबविण्यात येणार आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद : नामांतराच्या लढ्यासाठी वकिलांची फौज उभी करणार - इम्तियाज जलील

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या निर्णयाला एमआयएमने विरोध केला आहे. तर या निर्णयानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी रात्री महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. सोबतच कायदेशीर लढाई लढण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आवाहन सुद्धा केले. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर जिल्ह्यात 1 जुलैपासून प्लास्टिक बंदी, उद्योजक म्हणतात लगेच कारवाई नको

Single Plastic Use Ban : कोल्हापूर जिल्ह्यात 1 जुलैपासून प्लास्टिक बंदीची (Single Plastic Use Ban) कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असलेल्या 'सिंगल यूज प्लास्टिक'ची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित उत्पादकांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादकांनाच निर्मिती केलेल्या उत्पादनाची विल्हेवाट किंवा पुनर्वापर करून  घ्यावा लागेल. याला सक्षम पर्याय निर्माण होत नाही, तोवर उत्पादकांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद : मानलेल्या बहिणीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Aurangabad News: रक्ताच्या नात्यापलीकडे सुद्धा काही मानेलेली नाते असतात जे सख्या नात्यांपेक्षा अधिक घट्ट असतात. मात्र औरंगाबादमध्ये याच नात्याला काळीमा फासणारी घटना 2011 मध्ये औरंगाबादमध्ये समोर आली होती. मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन बहिणीवरच एका नराधमाने मित्रांच्या मदतीने अत्याचार केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आता न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 62 हजार रुपये दंड ठोठावला. रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्लादादा (२३, रा. भावसिंगपुरा) असे या आरोपीचे नाव आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

नाशिक जिल्ह्यात निधीवरून नाराजीनाट्य शमणार, समान निधी वाटपाचे भुजबळांचे निर्देश

निधी मिळत नसल्याबाबतची आमदारांची नाराजी किती टोकाची असते, त्यामुळे अख्ख सरकार हलू शकत, हे शिंदे यांच्या बंडखोरीमुळे पुढे आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा नियोजन समितीस प्राप्त होणार्‍या निधीचे सर्व मतदार संंघामध्ये समान वाटप होईल. या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी प्रशासनास दिल्या आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्स्प्रेस आता रोज

Nanded Pune Express Update : मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्सप्रेस आता रोज धावणार आहे. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक 12730/12729 द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचून पुण्याहून सुटणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होईल. 5 जुलैपासून नांदेड-पुणे-नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा सुरु  होणार आहे. 5 जुलैपासून ही रेल्वे सेवा नवीन क्रमांकाने सुरु होईल. या गाडीचा 12730/12729 हा क्रमांक बदलून 17630/17629 असा करण्यात आला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

श्रेय घेण्यासाठी जाता-जाता नामांतराचा निर्णय, इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात परवानगी दिल्या नंतर एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी रात्री कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना जलील म्हणाले की, 'औरंगाबादमध्ये येऊन विकासाच्या मुद्यावर बोलणारे ठाकरे यांनी सत्ता जातं असल्याचं कळताच औरंगाबादच नाव बदललं. नामांतराचं श्रेय आपल्याला मिळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाता-जाता हा निर्णय घेतला असून, त्यांना संभाजीराजेंबद्दल कोणतेही प्रेम नाही.'



 

नांदेड : दवाखान्या समोरील दोन मोटारसायकल चोरट्यांनी पळवल्या

नांदेड : मुदखेड शहरातील उमरी रोडवर असणाऱ्या एका खासगी रुग्णालयासमोरून चोरट्यांनी दोन दुचाकी पळवल्याची घटना घडलीय. दरम्यान दुचाकी चोरीची ही संपूर्ण घटना दवाखान्यात असणाऱ्या CCTV कॅमऱ्यात कैद झालीय. गेल्या काही दिवसांपासून मुदखेड येथे रात्रीच्या सुमारास दुचाकी वाहन चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.

काटेवाडी : पालखी सोहळ्यात मेंढ्याचं रिंगण

काटेवाडी या शरद पवारांच्या गावामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मेंढ्याचं रिंगण पार पडलं... त्याची ड्रोन दृश्यं पाहा.


 





वारीच्या वाटेवर आरोग्य विभागाचे 200 आरोग्य दूत

सातारा : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यात वयोवृद्ध वारकऱ्यांचा मोठा सहभाग असतो. म्हणून या वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी सातारा जिल्हा परिषदेने 200 आरोग्य दूध नेमले आहेत. विशेष म्हणजे हे आरोग्य दूत मोटरसायकल वरून  वारकऱ्याकडे जाऊन त्यांना कोणत्या प्रकारची आरोग्यविषयक अडचण आहे. त्यांना कोणत्या उपचाराची गरज आहे याची विचारपूस करतात.

बारामती : तुकाराम महाराजांच्या पालखी समोर धोतराच्या पायघड्या

बारामती : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने बारामतीचा मुक्काम आटपून ज्यावेळी पुढे सनसर कडे प्रस्थान केलं. रस्त्यात काटेवाडी हे गाव लागत. काटेवाडी हे शरद पवार यांचं गाव आहे. या गावांमध्ये अगदी वाजत गाजत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत झालं. त्यानंतर गावाच्या वेशीवर पालखी सोहळा पोहोचल्यानंतर परीट समाजाच्या वतीनं पालखीच्या समोर धोतराच्या पायघड्या टाकण्याची मोठी परंपरा पार पडली.

अहमदनगर : पोलीस कर्मचारी झाले वारकरी

विठुरायाच्या दर्शनाची आस मनात धरून पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत जाणाऱ्या वारकऱ्यांचा मुक्काम हा एखाद्या मंदिरात, शाळेत होत असतो पण गेल्या 43 वर्षांपासून अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात मालेगाव येथील सिद्धेश्वर महाराजांच्या दिंडींचा मुक्काम असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीचे आगमन पोलीस ठाण्यात झाले. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांचे जोरदार स्वागत केले. हाती टाळ घेत पोलीसही दिंडीत सहभागी झाले. पोलिसांनी भजन, हरिपाठ केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या स्थापनेपासून मालेगाव येथील ही दिंडी येथे मुक्कामाला येते. या दिंडीच्या मुक्कामाची आणि महाप्रसादाची व्यवस्था पोलिसांकडून केली जाते. सण, उत्सवाच्या काळात पोलीस कर्मचाऱ्यांना इच्छा असून त्यात सहभागी होता येत नाही, पंढरपूरला जाता येत नाही. परंतु अशा पद्धतीने दिंडीचे स्वागत करून त्यातच विठ्ठल भेटला असे मानून सर्व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय या दिंडीची सेवा करतात असं पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

चिंताजनक! देशात 18,819 नवे कोरोनाबाधित

Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नाहीय. कोरोना संसर्गाचा आलेख वाढतानाच दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 819 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या 1 लाख 4 हजार 555 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

बेळगाव पोलिसांकडून गुंडांच्या घरावर धाडी टाकत घातक शस्त्रे जप्त

बेळगाव शहरात वाढत असलेल्या गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पहाटे पाच वाजता शहरातील गुंडांच्या घरावर पोलिसांनी धाडी टाकून काही गुंडांच्या घरातून घातक शस्त्रे जप्त केली.कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली दीडशे हून अधिक अधिकारी आणि पोलिसांनी शहरातील विविध भागात ही कारवाई केली.




सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

मुंबई : कांदिवली प्रेमप्रकरणातून तिघींची हत्या करत आरोपीची आत्महत्या

मुंबईतील कांदिवलीमध्ये चार जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापैकी तीन जण एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, चार मृतांपैकी एक ड्रायव्हर असल्याचं समोर येत आहे. तर इतर तीन मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून झाल्याचं उघड होत आहे. ड्रायव्हरने मालकीनं आणि तिच्या दोन मुलींची हत्या करत स्वत: आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.






 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पुढील तीन ते चार दिवसात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain : सध्या राज्यात काही भागात पावसानं दडी मारली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात रात्ररभर पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबईकरांना उष्णेतापासून दिलासा मिळाला आहे. तसेच गडचिरोलीतही 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये देखील समाधानकारख पाऊस झाला. या ठिकाणी पडलेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर दुसरीकडे अद्यापही पावसानं दडी मारली आहे. तेथील शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही प्रामुख्यानं घाट विभागांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

औरंगाबादच्या नामांतरावरून MIM रस्त्यावर उतरणार, तर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यांनतर यावरून राजकीत वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. सरकारच्या या निर्णयालाविरोध करण्यासाठी MIM कडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांनी या निर्णयामुळे नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

महाविकास आघाडी सरकारची जाता जाता सांगली सिव्हिलसाठी मोठी घोषणा

महाविकास आघाडी सरकारने सरकार कोसळण्याच्या पूर्वसंध्येला सांगलीमधील गोरगरिबांचा आधार असलेल्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासाठी (सिव्हिल हॉस्पिटल) मोठी घोषणा केली आहे. या शासकीय रुग्णालयासाठी 233.34 कोटी रुपये खर्चाला सरकारकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार (सांगली सिव्हिल) रुग्णालयाच्या 500 खाटांची सुविधा असलेल्या चार मजली सुसज्ज इमारतीसाठी तसेच निवासी डॉक्टरांसाठी तीन मजल्यांचे वसतिगृह आणि अद्ययावत शवागार बांधण्यासाठी 233.34 कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

उद्योजक संजय बियाणींच्या हत्या प्रकरणी मोठी कारवाई; कुख्यात मटका किंगला अटक

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने आणखी दोघांना अटक केली आहे. ज्यात नांदेड जिल्ह्यातील कुख्यात मटका किंग कमल यादव आणि गुरुप्रितसिंग खेरा या दोघांना मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या दोघांनाही 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. 5 एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची घरासमोरच दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटीने 13 जणांना अटक केली होती. या सर्व आरोपींनी कट रचून बियाणी यांची हत्या केली होती.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील अमरनाथ यात्रेच्या मार्गाच्या अगदी जवळ ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांना हे यश मिळाले. चकमकीत ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख लष्कर-ए-तैयबाचे (LET) दहशतवादी अशी झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मारलेल्या दहशतवाद्यांची लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी म्हणून ओळख पटली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त

आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष रद्द झाल्यानंतर यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पहलगाम बेस कँमवर सुमारे 10 हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. यंदाची अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडे तणावाचं वातावरण आहे, यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय परिसरात अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त
आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष रद्द झाल्यानंतर यंदाच्या वर्षी होत असलेल्या बाबा बर्फानी (Baba Barfani) यांच्या यात्रेला यात्रेकरूंचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. पहलगाम बेस कँमवर सुमारे 10 हजार यात्रेकरु पोहोचले आहेत. यंदाची अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेची सांगता 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडे तणावाचं वातावरण आहे, यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासन तसेच पोलीस प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहे. पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिवाय परिसरात अतिरिक्त जवानही तैनात करण्यात आले आहेत. 


जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश


जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील अमरनाथ यात्रेच्या मार्गाच्या अगदी जवळ ही चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांना हे यश मिळाले. चकमकीत ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख लष्कर-ए-तैयबाचे (LET) दहशतवादी अशी झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मारलेल्या दहशतवाद्यांची लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी म्हणून ओळख पटली आहे.


आसाममध्ये पुरामुळं शेतीचं मोठं नुकसान


संततधार मुसळधार पावसामुळं आसाममध्ये पूर आला आहे. पुरामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील 40 लाखाहून अधिक लोक या पुरामुळं बाधित झाले आहेत. तर पूर आणि भूस्खलनामुळं आत्तापर्यंत 134 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. कालदिया नदीला आलेल्या पुरामुळे सध्याची परिस्थिती आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बजली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी भबानीपूर, बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आसाममधील 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. 


 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजपच्या गोटात जल्लोष सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. विरोधात निकाल गेल्यानं उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं जनतेला सांगितलं.


आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. आज या सत्तासंघर्षाचा दहावा दिवस. विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींनं सांगण्यात आलं. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.