Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

Continues below advertisement

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त कली खदखद

बीडच्या पालकमंत्रीपदापासून धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एक वक्तव्य केले आहे. मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे. त्यात मी सुखी आहे. मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर मला आनंद झाला असता. कारण मी पाच वर्ष बीडची पालकमंत्री (Beed Guardian Minister) होती. तेव्हा बीडचा विकास चांगला झाला होता. आता जे निर्णय झाले त्याच्याशी असहमती न दर्शवता मी अधिक जोमाने काम करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्या सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. मात्र, यामध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नेमण्याच्या आदेशाला तातडीने स्थगिती देण्यात आली होती. याविषयी पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी यावर फार बोलण्यास नकार दिला. नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली यासंदर्भात मला काही माहिती नाही, मी बोलणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram