एक्स्प्लोर

Nanded Pune Express : मराठवाड्यासाठी गूडन्यूज! आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्स्प्रेस आता रोज 

Nanded Pune Express Update : मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्सप्रेस आता रोज धावणार आहे.

Nanded Pune Express Update : मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्सप्रेस आता रोज धावणार आहे. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक 12730/12729 द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचून पुण्याहून सुटणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होईल. 5 जुलैपासून नांदेड-पुणे-नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा सुरु  होणार आहे. 5 जुलैपासून ही रेल्वे सेवा नवीन क्रमांकाने सुरु होईल. या गाडीचा 12730/12729 हा क्रमांक बदलून 17630/17629 असा करण्यात आला आहे.

या गाडीचे पहिली उद्घाटन फेरी दिनांक 4 जुलै 2022 रोजी जालना येथून सुटेल. पूर्वीचे नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचे गत स्थानक बदलून ते पुणे करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी हे सोयीस्कर झालेय. मराठवाड्यातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्री सोयीच्या वेळेनुसार ही रेल्वे गाडी चालवली जात आहे, जेणेकरून ते सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचतील. गाडी क्रमांक 17630 नांदेड - पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून दररोज दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.  परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक  17629 पुणे - नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून रात्री 21.35 वाजता सुटेल आणि नांदेड स्थानकावर सकाळी 10.20 वाजता पोहोचेल. 

डब्यांच्या आत आणि प्रवेश दारावर सीसीटीव्ही कॅमेरे

दरम्यान ही ट्रेन मराठवाड्याला महाराष्ट्राचं औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुण्याशी जोडते.  आरामदायक प्रवासात वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी, ट्रेनमध्ये नवीन अत्याधुनिक LHB कोच (डब्बे) जोडण्यात आले आहेत, जे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा नवीन अनुभव देईल.  प्रवाशांना निर्धोक आणि सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने डब्यांच्या आत आणि प्रवेश दारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जे अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यास मदत करतील, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 
 
असं असेल गाडीचं वेळापत्रक

गाडी संख्या 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस : ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे पुणे रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 05.20 वाजता पोहोचेल.  
गाडी संख्या 17629 पुणे ते नांदेड एक्स्प्रेस : ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून रोजी रात्री 21.35 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.05 वाजता पोहोचेल. 
या गाडीत 15 डब्बे असतील ज्यात वातानुकुलीत प्रथम श्रेणी, वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, द्वितीय शय्या (स्लीपर क्लास ) आणि जनरल चे डब्बे असतील.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Abhijeet Dipke: एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
Embed widget