Mumbai Building Collapse : मुंबईतील कुर्ला परिसरात दुर्घटना; चार मजली इमारत कोसळली, 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकले
Mumbai Building Collapse : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे,
Mumbai Building Collapse : मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली, काल रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे, आतापर्यंत 4 ते 5 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
Kurla, Mumbai | A 4-storey building collapses in Naik Nagar. Fire brigade team, police at the spot as rescue operation continues
— ANI (@ANI) June 27, 2022
As per BMC, 7 people rescued from under debris are in stable condition; 20 to 25 likely to be trapped under the debris. Rescue operation on pic.twitter.com/M9stC1eFh6
आतापर्यंत 4 ते 5 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले
मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी हजर आहेत. बचाव कार्यात आतापर्यंत 5 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून 5 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरू आहेत, आदित्य ठाकरेंनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हा जेव्हा बीएमसी नोटीस देईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशी घटना घडू नये.