सांगली: सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर , आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जेष्ठ नेते मा. मंत्री श्री. आण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला. यापूर्वी या आमदाराची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यावरून भाष्य केले. तर पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका केली.
जयंत पाटील 11 हजार मताने निवडून आले म्हणजे ते पडल्यासारखे आहेत. जयंत पाटील यांचे दुसरे दुखणे म्हणजे आर आर पाटील यांचा मुलगा आमदार होतो पण जयंत पाटील यांना आपला मुलगा आमदार होत नाही याचे टेन्शन आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांना देखील आर आर पाटील ( (R R Patil) यांचा मुलगा आमदार झाला पण आपला मुलगा आमदार होत नाही याचे टेन्शन असल्याची खोचक टीका पडळकर यांनी केली. जत तालुक्यात जयंत पाटील यांनी आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी चाचपणी केली. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात (Ichalkaranji Lok Sabha) देखील चाचपणी केली, पण सगळीकडचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असे पडळकर म्हणाले. त्यामुळे सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची वेळ गेली आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर आता राजकारण होत असते तर मी आमदार झालो नसतो, असेही पडळकर म्हणाले. या सगळ्याबाबत आता जयंत पाटील काय बोलणार आणि पडळकरांच्या टीकेला कशाप्रकारे उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सांगलीतून बाबासाहेब देशमुखांना मंत्रिपद मिळण्याची आशा
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आज सांगली, सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याचे दुःख व्यक्त केले. सांगली, सोलापूरचे दुःख एकच आहे, दोन्ही जिल्ह्याला महायुतीत मंत्रिपद नाही पण येत्या काळात महायत ही मंत्रिपदाची उणीव देखील भरुन काढतील असा विश्वास ही देशमुख यांनी व्यक्त केला. सांगलीत ज्यांना मंत्रिपद द्यावे असे तुम्हाला वाटते जे तुमच्या मनात आहे, तेच आमच्या मनात आहे, असं म्हणत बाबासाहेब देशमुख यांनी पडळकर यांना अप्रत्यक्ष मंत्रिपद देण्याची मागणी केली.
आणखी वाचा
मी आता बाळूमामाच्या मोडमध्ये; गोपीचंद पडळकर म्हणाले, फडणवीसांनी मला संयम राखायला सांगितलंय, पण...