एक्स्प्लोर

PAN-Aadhaar Linking Penalty : पॅन कार्ड आधारशी लिंक केलं? आजच करा, नाहीतर भरावा लागेल 1000 रुपयांचा दंड

PAN-Aadhaar Linking Penalty : आयकर विभागाच्या नियमांनुसार, 31 मार्चनंतर UIDAI नं 500 रुपयांच्या दंडासह पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली होती. आज ही मुदत संपतेय. त्यामुळे 1 जुलैपासून आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे.

PAN-Aadhaar Linking Penalty : तुम्ही तुमचं पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डला (AADHAAR) लिंक केलंय का? केलं नसेल तर, लगेच करा. कारण आज शेवटची तारीख आहे. आज जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाहीतर मात्र दुप्पट दंड भरावा लागणार आहे. दुप्पट दंड यासाठी कारण पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची UIDAI नं दिलेली मुदत 31 मार्च होती. पण त्यानंतर 500 रुपयांच्या दंडासह 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. पण तरिही कोणी आधार आणि पॅन लिंक केलं नाही, तर मात्र त्यांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. 

31 मार्चनंतर UIDAI नं 500 रुपयांच्या दंडासह पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली होती. आज ही मुदत संपतेय. त्यामुळे 1 जुलैपासून आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी दुप्पट दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, सरकारनं 31 मार्चनंतर 500 रुपयांची लेट फी लावली होती. आता उद्यापासून ही फी दुप्पट आकारली जाणार आहे. 

आधार कार्ड पॅनसोबत (PAN Aadhaar Link) कसं लिंक कराल? 

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस

आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.

पॅन-आधार लिंक करण्यासाठी दंड भरण्याची प्रक्रिया

https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean वर क्लिक करा.
त्यानंतर Linking Request मध्ये CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा. 
त्यानंतर Tax Applicable पर्याय निवडा.
तुम्हाला 30 जूनपर्यंत 500 रुपये दंड भरावा लागेल.
दंड भरण्याची पद्धत निवडा.
पुढे नेट बँकिंग प्रक्रिया (Net Banking Process) किंवा कार्ड मोडद्वारे पेमेंट करा.
पॅन क्रमांक आणि Assessment Year प्रविष्ट करा.
कॅप्चा प्रविष्ट करा.
तुम्ही Submit पर्यायावर क्लिक करताच पॅन आणि आधार लिंक होतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Embed widget