एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : शरद पवार यांच्या भेटीला गृहमंत्री दिलीप वळसे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates :  शरद पवार यांच्या भेटीला गृहमंत्री दिलीप वळसे

Background

Petrol Diesel Price : महंगाई डायन खाए... पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले; पेट्रोल 30 तर डिझेल 35 पैशांनी महाग

Petrol-Diesel Price Today 28 March 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर  परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम किमतींवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज म्हणजेच, 28 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. ही वाढ गेल्या 7 दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) 6 वेळा वाढल्या आहेत. 

किती रुपयांनी वाढणार पेट्रोल-डिझेल? 

सोमवार 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली असून, त्यानंतर एक दिवस वगळता दररोज काही ना काही दरांत वाढ होत आहे. 28 मार्चच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागलं आहे. 

Pravin Darekar : प्रवीण दरेकर घेणार हायकोर्टात धाव; अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करणार

Pravin Darekar Mumbai Bak : मुंबई बँकेत मजूर म्हणून बोगस नोंद करून संचालक मंडळात निवडून गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप प्रवीण दरेकर आज हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र, मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता.

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. प्रवीण दरेकर यांनी बोगस पद्धतीने मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे.

20:12 PM (IST)  •  28 Mar 2022

दिदींच्या तैलचित्राचे अनावरण माझा हस्ते झाले, मी ऋणी आहे : विक्रम गोखले

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तैलचित्राचे अनावरण विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पार पडते. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकरांसह कुटुंबीय उपस्थित आहे. यावेळी बोलताना विक्रम गोखले म्हणाले आहेत की, ''दिदींच्या तैलचित्राचे अनावरण माझा हस्ते झाले मी ऋणी आहे.''

19:44 PM (IST)  •  28 Mar 2022

Pune : तू तर पुष्पातील  श्रीवल्ली म्हणत  पुण्यात दोन तरुणांकडून तरुणीचा विनयभंग

Pune : पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली संबोधून पुण्यातील धनकवडी परिसरातील दोन तरुणांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय, या दोघांविरोधात सहकारनगर  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल आणि आरबाज अशी या दोघांची नावे आहेत.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुण्यातील धनकवडी येथे राहायला आहे. काल रात्री याच परिसरात ती तरुणी आपल्या घराजवळ थांबली असताना , आरोपी सोहेलने  तरुणीला पाहत शिट्टी वाजवायला सुरुवात केली आणि तू पुष्पा चित्रपटातील हीरोइन श्रीवल्ली सारखी दिसतेस, मला तुझ्या सोबत लग्न करायच आहे असे म्हणत सोहेलने पीडीतेला मिठी मारली. या सगळ्याच प्रकारानंतर पीडित तरुणीने आरडाओरड सुरू केली त्यानंतर तिचा सख्खा भाऊ तिथे आला. पण सोहेल आणि अरबाज या दोघांनीही त्याला मारहाण केली आणि तिथुन फरार झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून अरबाज आणि सोहेल यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19:37 PM (IST)  •  28 Mar 2022

नाचत हवेत गोळीबार करणाऱ्या नवरदेवा सह पाच जणांवर गुन्हा दाखल..

हळदीच्या कार्यक्रमात डिजेच्या तालावर नाचत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी चक्क पिस्तुलं बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आणि पोलीस प्रशासनाने नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला...अंबाजोगाई शहर पोलिसांनी पो.ना. गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून बालाजी चाटे, शेख बाबा (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) आणि इतर तिघांवर अवैधरीत्या पिस्टल हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी कलम ३३६ सह शस्त्रास्त्र कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला

18:13 PM (IST)  •  28 Mar 2022

Yavatmal News Update : यवतमाळमधील दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे ग्राम पंचायतीच्या मासीक सभेत सदस्याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न  

Yavatmal News Update : ग्राम पंचायतीच्या मासीक सभेत ग्राम पंचायत सदस्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामधील लाडखेड येथे ही घटना घडली आहे. आपल्या वार्डमधील पाणी टंचाईची समस्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक विलास हेडावू यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप करत या सदस्याने पेटवून घेण्याच प्रयत्न केला.    

17:42 PM (IST)  •  28 Mar 2022

Pune : पुण्याच्या बावधनमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने गाडीची केली तोडफोड

पुण्याच्या बावधनमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर संबंधित महिलेने गाडी मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. एकाच इमारतीत ते राहतात. पोलीस उपनिरीक्षकांच्या सासऱ्यांचा नावे तिथं फ्लॅट आहे. लगत सासऱ्यांच्या मामाचे फ्लॅट आहे. सासऱ्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यामुळे सध्या पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी तिथे येत असते. अलीकडेच त्यांनी फ्लॅट समोर थोडं बांधकाम सुरू केलं. त्याला विरोध केल्याने पीएसआयची पत्नी संतापली आणि तिने गाडीची अशी तोडफोड केली. तसेच मारहाण केल्याचा दावा केला आहे, म्हणून हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. तर पीएसआयच्या पत्नीने गाडी मालकाने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget