एक्स्प्लोर

Sugar Exports : साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे टन निर्यातीला मुदतवाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Sugar Exports : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री पियुष गोयल यांना साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा देण्याची विनंती केली होती.

Sugar Exports : केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी 8 लाख मे टन साखर निर्यातीला मुदतवाढ दिलीय. राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी या संदर्भात मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. साखरेला 8 लाख मे टन निर्यात करण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री पियुष गोयल यांना साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा देण्याची विनंती केली होती. महाडिक यांनी मंत्री गोयल यांना याबाबत एक निवेदन दिले, ज्यात म्हटलंय की, Open General Licence (OGL) अंतर्गत अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठविलेली साखर बंदरांपर्यंत पोहोचली आहे. 

...तर साखर कारखान्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल

यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडीक म्हणाले, चांगल्या पावसामुळे साखरेचं बंपर उत्पादन झालं होते. त्यामुळे 90 लाख मे टन साखर निर्यात झाली होती. त्यामुळे साखरेचे भाव वाढत चालले होते. त्यामुळे साखर निर्यातीवर बंदी घातली होती. दरम्यान, कच्ची साखर डोमेस्टीक साठी वापरली जात नाही. ती पडून राहील. या साखरेची विक्री झाली नसती तर उद्योग अडकला असता. जे करार साखर कारखान्यांचे झाले होते ते अडकून पडले होते. या प्रकरणी पियुष गोयल यांना माहिती दिली आहे. साखर कारखानदारांकडे शिल्लक असलेल्या साठ्यामधील कच्च्या साखरेला प्राधान्याने ERO जारी करण्याची गरज आहे. देशात कच्च्या साखरेचा खप मर्यादीत आहे. त्याचे उत्पादन केवळ निर्यातीसाठीच केले जाते. गुणवत्तेच्या कारणामुळे याचा दीर्घकाळ साठा केला जाऊ शकत नाही. जर कच्ची साखर वेळेवर निर्यात केली गेली नाही, तर साखर कारखान्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.


महाडीक यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे (DFPD) कारखानदारांचे अर्ज प्रलंबित आहेत. संबंधितांकडून पडताळणी आणि आवश्यक छाननी करुन 31 मे 2022 रोजी बंदरात प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या साखरेला निर्यात रिलिज ऑर्डर जारी करून निर्यातीस परवानगी दिली जाऊ शकते, असेही त्यांनी सुचवले होते.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev Shastri Maharaj On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
Embed widget