एक्स्प्लोर

बिबट्याने मुलाला नेलं, मात्र जिगरबाज बापाने जीवाची बाजी लावून वाचवलं, बिबट्याशी भिडणारा झुंजार बाप

Leopard attack : जिगरबाज बापाने बिबट्याला हरवत आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे. या जिगरबाज बापाचं सध्या कौतुक होत आहे. 

Karad Satara Latest News : जिगरबाज बाप काय असतो, याचा प्रत्यय खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका गावात आलाय. बिबट्याने उचलून नेलेल्या आपल्या लेकराला वाचवण्यासाठी बापाने केलेला संघर्ष सध्या चर्चेचा विषय आहे. पाच फुटावरुन उडी मारुन बिबट्याने मुलाला नेलं होतं. पण जिगरबाज बापाने बिबट्याला हरवत आपल्या मुलाचा जीव वाचवला आहे. या जिगरबाज बापाचं सध्या कौतुक होत आहे. 
 
बापाच्या धाडसापुढे बिबट्याही हरला, चिमुकल्याला मिळाला पुनर्जन्म, शेतात काय घडले होतं?
शेतात तरकारी लावली होती. दिवसभर शेतातली कामे केल्यानंतर शेतातली वांगी, शेंगा घेऊन शेतकरी दुसऱ्या दिवशी बाजारात जाणार होता. लगबगीने सगळं शेतातलं काम संपवलं होतं. शेतकऱ्यासोबत असलेला मुलगा गडबडीने घरी जायच्या  तयारीत होता. बाबा भूक लागली, असं पोरगा बापाला सांगत होतं. थांब आता घरी गेल्यावर जेवण करूयात, असं म्हणून शेतकऱ्यांन पोराची समजूत काढली. शेतकऱ्याने शेतातलं काम आवरते घेतले.  एका हातात खूरपं आणि एका हातात फावडं, शेतकऱ्याच्या काखेतील पिशवीत असणारी कैची खाली पडली. शेतकऱ्यानं पोराला उचलायला सांगितली. त्याच वेळेला शेताच्या बांधावर  झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक उडी मारत पोराचं मानगुट पकडलं....

बापाला काही समजायच्या आत बिबट्याने पोराला ओडत नेहण्यास सुरवात केली. शेतकरी  बापाला काहीच सुधरेना. बिबट्याने  पोराला पकडल्याचं पाहिल्यावर शेतकऱ्यानं हातातलं सगळं सामान खाली टाकलं.  बिबट्याच्या दिशेने  छलांग मारली. पोराचा पाय हातात आला. पण कशाचं काय बिबट्यान हिसका देऊन पोराला फरपटत शेताच्या कुंपणापर्यंत नेहलं. बापाचा जीव कासावीस झाला होता. बाप मोठ्याने ओरडत बिबट्याच्या माघे पळत सुटला. राज राज म्हणत बिबट्याचा पाठलाग करत बांधावर पोहचला. अर्थातच त्या बिबट्याचा वेग बापानं धरला होता. कुंपणापर्यंत जाईपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्याने आपल्या पोराला घट्ट मिठी मारण्यासाठी छलांग मारली. मात्र फक्त पाय त्याच्या हातात आला.  यावेळीही बिबट्याने शेतकऱ्याला झटका देऊन त्याने पुन्हा पाच फूट कुंपणावरून जाण्यासाठी मोठी उडी मारली. दुसरीकडे शेतकऱ्याने तशीच छलांग मारून पोराला पकडण्याचा प्रयत्न केला. पाय हातात आला. बिबट्याची उडी कमी झाली आणि बिबट्या तारेवर गेला. बिबट्याला कुंपनाची तार आडवी आली होती. 

शेतकऱ्याने दाबून धरलेला पाय आणि तारेचा अडथळा यामुळे बिबट्याच्या तोंडातून राज अलगद बाहेर पडला. बापाने पोराला उचलून आपल्या कवेत घेतलं. मानेतून होणारा रक्तस्त्राव पाहून तो गहिवरला. डोक्याला बांधलेला टॉवेल काढून त्याने त्याच्या रक्त येणाऱ्या ठिकाणी दाबून धरले. पोराला घेऊन कसाबसा तो रस्त्यावर आला. तेवढ्यात एक वाहन तेथून जाताना दिसलं आणि त्याने वाहनाला थांबवले, आणि पोराला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. 

पाच फुटावरुन उडी मारुन बिबट्याने मुलाला नेलं, जिगरबाज बापाने बिबट्याला हरवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 17 June 2024Ravindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
विराट कोहली, रिंकू सिंग ते हार्दिक पांड्या, बीचवर यंग ब्रिगेडची धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Embed widget