एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविकासआघाडीच्या शपथविधी सोहळ्याच्या व्यवस्थेवर राज्यपाल कोश्यारी नाराज : सूत्र
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी गुरुवारी (27 नोव्हेंबर) शिवतीर्थावर पार पडला. परंतु या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शपथविधी सोहळाच्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्था नव्हती, असा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला आहे. शपथविधीदरम्यान मंचावरील अवस्थेवर राज्यपालांनी नाराजी दर्शवली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्यामते, "शपथविधी सोहळ्याच्या प्रोटोकॉलनुसार व्यवस्था नव्हती. शपथविधीची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही, ज्यामुळे मंचावर अव्यवस्था पाहायला मिळाली." राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्षेपही नोंदवला आहे.
या सोबतच शपथ घेण्याआधी आमदारांनी आपापल्या नेत्यांची नावं घेतली यावरही कोश्यारी नाराज होते. ते म्हणाले की, भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात असं होऊ नये. हे शपथविधी सोहळ्याच्या प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. अशी कृत्ये शपथविधी सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते.
उद्धव ठाकरेंसह सात जणांचा शपथविधी
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी शपथ सुरु केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना शपथ दिली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
शपथ घेताना आमदारांकडून 'यांचं' स्मरण
एकनाथ शिंदे - शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई-वडिलांचं स्मरण करुन शपथ घेतली.
सुभाष देसाई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शपथ घेतली.
छगन भुजबळ - राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करुन शरद पवारांच्या आदेशानुसार शपथ घेत असल्याचं सांगितलं.
जयंत पाटील - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांना वंदन करुन शपथ घेतली. यावेळी जयंत पाटील आपल्या आई-वडिलांचंही नाव घेतलं.
बाळासाहेब थोरात - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने शपथ घेत आहे, असं म्हटलं.
नितीन राऊत - काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन शपथ घेतली. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या साक्षीने शपथ घेत असल्याचं सांगितलं.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement