एक्स्प्लोर
महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठाकरे नतमस्तक; ऐतिहासिक क्षणांची खास दृश्य

1/10

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना वंदन केलं.
2/10

शपथविधीनंतर ठाकरे कुटुंबीयांनी मंचावर येऊन जनतेचे आभार मानले.
3/10

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.
4/10

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
5/10

शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
6/10

'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'.. छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन शपथ घेतो की..' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.
7/10

शिवतीर्थावर पार पडलेल्या महाशपथविधी सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
8/10

महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नतमस्तक झाले.
9/10

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वंदन केले.
10/10

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. (सर्व फोटो : राजेश वराडकर)
Published at : 29 Nov 2019 08:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
जळगाव
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
