एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंसह सात जणांचा लक्षवेधी शपथविधी, शपथ घेताना 'यांचं' स्मरण

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई : महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची आज शपथ घेतली. 'मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन उद्धव ठाकरे यांनी शपथ सुरु केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तमाम जनतेला वंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे , सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. यावेळी छगन भुजबळांनी महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून शरद पवारांच्या आदेशानुसार शपथ घेत असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनीही आज शपथ घेतली. जयंत पाटलांनी शरद पवार यांना वंदन करून शपथ घेतली. यावेळी जयंत पाटील आपल्या आई-वडिलांचेही नाव घेतले.

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई-वडिलांचं स्मरण करुन शपथ घेतली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शपथ घेतली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने शपथ घेत आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही शपथ घेतली. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन शपथ घेतली. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आशीर्वादाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या साक्षीने शपथ घेत असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवार साहेबांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवार साहेबांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
Ravi Rana: पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!
पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर दोन्ही शिवसेना...; आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या!
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget