शाळेला दांड्या मारणाऱ्या शिक्षकांना सरकार आणणार वठणीवर? राज्यभर 'आमचे गुरुजी' मोहीम राबवली जाणार
Maharashtra Government : राज्यभर सरकारकडून ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार आहे.
मुंबई : शाळेला दांड्या मारणाऱ्या शिक्षकांना (teacher) वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार (maharashtra government) तयारी करत आहे. राज्यभर सरकारकडून ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
ही मोहीम राबवत असताना शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदर वाढावा यासाठी हा प्रयोग करत असल्याचा राज्य दावा सरकार करणार आहे. परंतु, अनेक शाळांमध्ये बदली म्हणून नकली शिक्षक शिकवत असतात. या गोष्टीला आळा बसवण्यासाठी आमचे गुरूजी ही मोहीम राबण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
अनेक शाळांमध्ये बदली म्हणून नकली शिक्षक शिकवत असतात. त्यामुळे नेमके कोणते शिक्षक आपल्याला शिकवायला आहेत? याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्य सरकारचा हा नवा प्रयोग करणार आहे.
शालेय शिक्षण विभाग यावर लवकरच धोरण तयार करुन अंमलबजावणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अशैक्षणिक कामे अध्यापनाच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे घडत नसून, शाळेच्या वेळातच शिक्षक ही कामे करण्यासाठी बाहेर पडत असल्याचे राज्यभर चित्र आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या वेळात ही कामे न करण्याच्या सूचना देऊनही शिक्षक फिरतीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम राबवली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शाळा धोकादायक म्हणून पाडायला घाई, पण चार वर्षे झालं तरी बांधकाम नाही; श्रीरामपुरातल्या विद्यार्थ्यांचे झाडाखाली बसून शिक्षण
ना रस्ता, ना वीज, ना पाणी, ना शाळा! समस्यांना कंटाळून मुंबईजवळच्या गावाची वेगळा देश करण्याची मागणी