Kumar Sanu Ex Wife On Affair With Kunickaa Sadanand: 'ज्यावेळी मी गरोदर होते, त्यावेळी हे दोघं...'; कुनिका सदानंदसोबतच्या अफेअरवर कुमार सानूंच्या घटस्फोटीत पत्नीनं सगळंच सांगून टाकलं
Kumar Sanu Ex Wife On Affair With Kunickaa Sadanand: कुमार सानू यांच्या घटस्फोटीत पत्नीनं कुनिका सदानंदसोबतच्या अफेअरवर वक्तव्य केलं आहे.

Kumar Sanu Ex Wife On Affair With Kunickaa Sadanand: सध्या बिग बॉस 19 (Bigg Boss 19) मधील स्पर्धक असलेली अभिनेत्री कुनिका सदानंदनं (Actress Kunickaa Sadanand) गायक कुमार सानूसोबतच्या तिच्या नात्याबद्दल शोमध्ये खुलासा केला. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर चर्चांना उधाण आलेलं असतानाच, कुनिका सदानंदच्या मुलानं एक वक्तव्य केलं, त्यामुळे कुनिका आणि कुमार सानू (Kumar Sanu) यांच्या अफेअरच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला. कुनिका सदानंदच्या मुलानं म्हटलेलं की, ज्यावेळी माझ्या गर्लफ्रेंड्स होत्या, त्यावेळी आईचे बॉयफ्रेंड्स होते... अशातच आता कुमार सानू यांच्या घटस्फोटीत पत्नीनं आता यावर वक्तव्य केलं आहे.
कुनिका सदानंद हिनं बिग बॉसमध्ये अनेक खुलासे केले. अशातच अलिकडेच अभिनेत्रीनं खुलासा केलेला की, ती 27 वर्षांपासून एका विवाहित पुरूषासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये होती, पण, त्यानं तिला दुसऱ्या कुणासाठी तरी सोडून दिलं. कुनिकानं असंही स्पष्ट केलं की, ती आता मन मोकळं करण्यासाठी या सर्व गोष्टी सांगत आहे. दरम्यान, कुमार सानू यांच्या घटस्फोटीत पत्नी रीता भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत बोलताना कुनिकाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
कुमार सानू यांच्या घटस्फोटीत पत्नी रीता भट्टाचार्य म्हणाल्या की, "जेव्हा ती (कुनिका) सानूजींच्या दुसऱ्या कोणाशी तरी अफेअरबद्दल बोलली तेव्हा तीही हेच करत होती... जेव्हा सानूजी तिच्यासोबत राहत होते, तेव्हा त्यांचं अफेअर होतं, त्यावेळी ते विवाहित होते आणि त्यांनी माझ्याशी लग्न केलेलं. मी आमच्या मुलाची आई होणार होते, प्रेग्नंट होते..." रीता यांनी कुनिकाला असंही विचारलेलं की, ती 27 वर्षांपासून तिचं दुःख कसे लपवू शकली, जेव्हा तिला 26 वर्षांचा मुलगा आहे.
"ती सर्वांना सांगतेय की, तिनं गेल्या 27 वर्षांपासून तिचं दुःख मनात दाबून ठेवलंय. तुला 26 वर्षांचा मुलगा आहे. तुला इतकं दुःख कुठून मिळालं? विवाहित असूनही तू कोणाशी तरी प्रेमसंबंध ठेवू शकतेस, असं आम्हीतर कधीच ऐकलं नाही. तू आई आहेस आणि मी त्याविरुद्ध नाही, पण मी तुला खरं सांगतेय. जेव्हा तुला 26 वर्षांचा मुलगा आहे, तेव्हा तू 27 वर्षांच्या दुःखाबाबत कसं बोलतेयस? 70 वर्षांच्या महिलेशी लग्न करून 26 वर्षांचा मुलगा होऊ शकतो? माझ्या देशात तर, असं होत नाही...", असं रिटा भट्टाचार्य म्हणाल्या.
दरम्यान, रिटा भट्टाचार्या आणि कुमार सानू यांनी 1980 च्या शेवटी लग्न केलेलं. दोघांनाही तीन मुलं आहेत. 1994 मध्ये जोडप्याचा घटस्फोट झालेला. यावेळी कुमार सानू यांचं नाव कुनिका सदानंदशी जोडलं गेलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























