Mumbai Rains LIVE: पूर परिस्थिती भागात मदतीसाठी निमंत्रणाची वाट बघू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे कार्यकर्त्यांना आवाहन
Maharashtra live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील पाऊस, राजकारण, समाजकारण आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळवा.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: राज्यात आज देखील पावसाचा जोर असणार आहे. मात्र, त्याची तीव्रता कमी होताना दिसेल. आज उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत असल्याने राज्यावरील त्याची तीव्रता कमी होईल. मुंबई आणि ठाण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस आहे. नवी मुंबईत रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी साचलेले नाही.
वरंधा घाटात भीषण अपघात; कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, एक जखमी
पुणे : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव हद्दीत रात्रीच्या सुमारास टोयोटा कार (MH 12 HZ 9299) रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात राहुल विश्वास पानसरे यांचा मृत्यू झाला, तर राहुल देवराम मुटकुले हे जखमी झाले आहेत. दोघे गणपतीपुळे जात होते. पावसामुळे आणि धुक्यामुळे रस्ता न दिसल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला तडाखा; हातचे पीक गेल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत
Latur Rain : गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाचा लातूर जिल्ह्यात खरीप पिकांना मोठा फटका बसलाय... याचबरोबर या पावसाचा टोमॅटो पिकालाही तडाखा बसलाय... ऐन काढणीच्या वेळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे... त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्किल बनले आहे... एक एकर टोमॅटो लागवडीसाठी साधारणतः ३० ते ४० हजार रुपये इतका खर्च येतो... पावसामुळे टोमॅटोच्या बागेचे नुकसान झाल्याने हा लागवडीचा खर्च तरी काढायचा कसा ? असा प्रश्न टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर साध्या निर्माण झालाय...सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय..
























