पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णय; अंमलबजावणी करण्यापूर्वी जाणून घेतली जात आहेत शिक्षकांची मतं
Maharashtra News: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे.
Maharashtra Education News: मुलांच्या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील शिक्षकांचे मत जाणून घेण्यासाठी मंडळाच्या वतीने शिक्षकांना प्रश्न विचारले जात आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यावतीने पाठ्यपुस्तकातच वह्याची पाने देण्यासंदर्भात नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी आणि याची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यभरातील शिक्षकांकडून त्यांची मतं जाणून घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाठ्यपुस्तकातच लिहिण्यासाठी वह्यांची पानं लावण्याच निर्णय घेण्यात आला होता.
यामध्ये इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रमुख विषयांसाठी किती पानांच्या वह्या लागतात याची माहिती शिक्षकांना भरायची आहेत. त्यासोबतच आणखी प्रश्न या संदर्भात शिक्षकांची मत जाणून घेण्यासाठी विचारले आहेत.
शिक्षकांना नेमके कोणते प्रश्न विचारले जात आहेत...
कोणत्या इयत्तेपासून पाठाच्या नोंदी वह्यांमध्ये काढतात ?
वह्याची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यात विद्यार्थ्यांना कितपत फायदा होईल ?
वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्यास वहीचा वापर थांबेल का ?
या योजनेचा लाभ वर्गातील किती टक्के विद्यार्थ्यांना होईल ?
वर्गात शिकत असताना विद्यार्थी या पानांवर महत्त्वाच्या नोंदी नोंदवतील का ?
या योजनेबद्दल आपण आपले मत नोंदवावे ?
वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी छोटीशी प्रश्नावली
पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केली असल्याचा बालभारतीकडून सांगण्यात आलं आहे
या सगळ्या प्रश्नांचा विचार करून राज्यभरातील शिक्षकांचं या पाठ्यपुस्तकातच वह्यांची पान देण्याच्या निर्णयावर एकत्रित मत विचारात घेऊन लवकरच पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पान जोडली जाणार आहेत.
ही बातमी देखील वाचा-
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI