Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 2678 नव्या रुग्णांची नोंद, नागपूर विभागात बी ए.2.75 व्हेरीयंटचे २० रुग्ण
Maharashtra Coronavirus Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात दोन हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Maharashtra Coronavirus Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात दोन हजार 678 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन हजार 238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी 3238 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,28,352 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.91% एवढे झाले आहे.
आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू -
धक्कादायक बाब म्हणजे, राज्यात गुरुवारी आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 1.85% एवढा झालाय आहे. बुधवारी राज्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.
नागपूर विभागात बी ए.2.75 व्हेरीयंटचे 20 रुग्ण
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर विभागात बीए.2.75 व्हेरीयंटचे एकूण 20 रुग्ण आढळले आहेत. यातील 17 रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. हे सर्व नमुने 15 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीतील आहेत. यातील 11 पुरुष आणि 9 स्त्रिया आहेत.
या रुग्णाचा वयोगट :
18 वर्षांपेक्षा कमी : 1.
19 ते 25 वर्षे : 9
26 ते 50 वर्षे : 6
50 वर्षांपेक्षा जास्त : 4
प्राथमिक माहिती नुसार हे सर्व रुग्ण लक्षण विरहित किंवा सौम्य स्वरूपाचे असून ते आजारातून बरे झाले आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. या मुळे आतापर्यंत राज्यात आढळलेल्या बीए. 2.75 या वेरियंटची संख्या 30 झाली आहे.
19413 अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात सध्या एकूण 19413 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबई आणि पुण्यातमध्ये आहेत. मुंबईत 4875 आणि पुण्यात सहा हजार 79 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यामध्ये तीन हजार 131 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.