Maharashtra Corona Update : राज्याला मोठा दिलासा, सोमवारी 41 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 41 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 87 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात केवळ 41 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 732 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 41 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 87 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकही कोरोनाचा मृत्यू नाही
राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 97, 05, 301 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 732 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 732 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 313 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 52 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात नवीन 929 कोरोना रुग्णांची नोंद
आज भारतात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 929 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 1054 रुग्ण नोंदवले गेले आणि 29 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 58 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 691 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 3 हजार 383 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. याआधी रविवारी भारतात एकाच दिवसात कोरोनाचे 1 हजार 54 नवीन रुग्ण आढळले होते आणि 29 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
