एक्स्प्लोर

Maharashtra Corona Cases : रविवारी राज्यात केवळ 3,378 रुग्णांना डिस्चार्ज तर 9,336 नवीन रुग्ण, 38 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही

राज्यात (Maharashtra corona cases) काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात आज केवळ 3,378 रुग्णांनाच डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,336 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात आज केवळ 3,378 रुग्णांनाच डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,336  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस हळू हळू वाढू लागल्या आहेत. अॅक्टिव्ह केसेस आता एक लाख 23  हजारांच्या वर  गेल्या आहेत. आज मालेगाव आणि गोंदियामध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1461 तर कोल्हापूर शहरात 389 असे एकूण 1850 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सांगलीचा आकडाही हजारांच्या वर नोंदवला आहे. आज 38 मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 

Mumbai Corona Update : मुंबईत आज 548 रुग्णांची नोंद, धारावीत आज एकही रुग्ण नाही

राज्यात काल 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 9,489  नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आजपर्यंत 58,48,693 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,23,225  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.91  टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,25,42,943 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,98,177 (14.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,38,004 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,198 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 548 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Mumbai Pune Corona Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 548 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 705 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,98,696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 767 दिवसांवर गेला आहे. 

आज धारावीत शून्य रुग्ण

आशिया खंडातील सर्वात मोठी दाटवस्ती असलेली झोपडपट्टी धारावीची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु झालेली पाहायला मिळत आहे. धारावीमध्ये आज एकाही नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नसून सध्या फक्त कोरोनाचे 22 सक्रीय रुग्ण राहिले आहेत.  याआधी 15 जून रोजी देखील धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली होती. 

पुणे शहरात आज नव्याने 316 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुणे शहरात आज नव्याने 316 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 79 हजार 732 इतकी झाली आहे.शहरातील 329 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 68 हजार 337 झाली आहे.पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 734 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 93 हजार 608 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 783 रुग्णांपैकी 297 रुग्ण गंभीर तर 439 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 612 इतकी झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
Embed widget