एक्स्प्लोर
विस्तारात अनेकांना सुखद धक्का; शिंदेंचं प्रमोशन, जानकरांची स्वप्नपूर्ती
मुंबई : राज्याच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज संपन्न झाला. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 11 जणांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाली सी. विद्यासागर राव यांनी भाजपच्या 7, शिवसेनेच्या 2 आणि मित्रपक्षाच्या 2 जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
बुलडाण्याचे पांडुरंग फुंडकर, शिंदखेडाचे जयकुमार रावल, निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर, सोलापूरचे सुभाष देशमुख आणि राम शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाही कॅबिनट मंत्रिपद देत मुख्यमंत्र्यांनी सुखद धक्का दिला आहे.
याशिवाय शिवसेनेचे जालनाचे आमदार अर्जुन खोतकर आणि जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय यवतमाळमधील भाजपचे आमदार मदन येरावार आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनाही राज्यमंत्रिपद मिळालं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
महादेव जानकरांची स्वप्नपूर्ती
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात महादेव जानकरांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महादेव जानकर अनेक दिवसांपासून कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी करत होते. शिवाय त्यांनी वारंवार नाराजीही बोलून दाखवली होती. अखेर कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे.
शिवसेनेच्या वाट्याला गृहराज्यमंत्रिपद!
शिवसेनेच्या अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांनी आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान राम शिंदे यांचं प्रमोशन झाल्याने त्यांच्याकडील गृहराज्यमंत्रिपद शिवसेनेकडे जाणार आहे.
उद्धव ठाकरेंची शपथविधीला गैरहजेरी
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दांडी मारली. शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र केवळ दोनच राज्यमंत्रिपद मिळाल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement