Maharashtra Budget 2025:राज्याचा पर्यटन अर्थसंकल्प स्मारकांभोवती केंद्रीत? महाराष्ट्रासह परराज्यात एकूण 9 स्मारकांसाठी तरतूदी, अर्थमंत्र्यांनी काय केल्या घोषणा?
प्राचीन लेण्या, घनदाट वनसंपदा, सांस्कृतिक वारसास्थळे लाभलेल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन केवळ स्मारकांभोवतीच फिरणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

Maharashtra Budget 2025: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीमहाराजांसह महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांची वाढती यादी, दुसरीकडे महापुरुषांच्या अवमानावरून विधानसभेत होणारी खडाजंगी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. राज्याचा अर्थसंकल्प आज मुंबईत राज्यअर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला. यात महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाचा केंद्रबिंदू राज्यासह परराज्यातील स्मारकांभोवतीच केंद्रीत असल्याचं दिसून आलं. आग्रा, पानिपत, मुंबई, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांत महापुरुषांसच्या एकूण 9 स्मारकांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Tourism Budget 2025) प्राचीन लेण्या, घनदाट वनसंपदा, सांस्कृतिक वारसास्थळे लाभलेल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन केवळ स्मारकांभोवतीच फिरणार का? असा सवाल उपस्थित होतोय. राज्याच्या अर्थसंकल्पात दोन तीन घोषणा सोडल्या तर बाकी सर्व स्मारकांच्या उभारणीच्या आणि त्यासाठीच्या निधीच्या आहेत.
काय म्हणाले अर्थमंत्री अजित पवार?
महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा, प्राचीन लेण्या, गड किल्ले, घनदाट वनसंपदा असा वारसा लाभला आहे. पर्यटनक्षेत्राला खाजगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्याकरता राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. येत्या 10 वर्षात कन क्षेत्राला एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. मुघलांच्या नजर कैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील एक प्रेरणादायी प्रसंग आहे. शिवाजी महाराज आग्र्यात नजर कैदेत होते, तिथे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा ठरवले आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर आज मुंबईत राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला.
पर्यटनासाठी अर्थसंकल्पात काय?
- येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख व्हावी यासाठी अध्याया व तंत्रज्ञानातून करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव शहरात चार टप्प्यात भव शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार यातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन टप्प्यांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार
- छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठीशौर्य शिवसमर्पित केलेल्या श्रीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या लढायांमध्ये विजय मिळवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा असलेलं संगमेश्वर हे ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येईल एवढे सैन्य घेऊन पराक्रमाची शर्थ केली. स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारणार
- छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र स्थळ असणाऱ्या मोजे तुळापूर व मोजे वडे बुद्रुक या ठिकाणी परत प्रगती छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर .
- दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज गीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार .यानंतर संपूर्ण सभागृहाने छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत निर्णयाचे स्वागत केले .
- स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय .हरियाणात आमच्याच मुख्यमंत्री आहेत .असेही अर्थमंत्री अजित पवार म्हणाले
- मुंबई चैत्यभूमी दादर येथे हिंदू मिल च्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधले जाणार .त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून ते लवकर पूर्ण व्हावे यासाठी धोरण आहे
- भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईत भव्य स्मारक बांधला जाणार .
- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारकडून 220 कोटी रुपयांचा निधी
- सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार
- साहित्यरत्न स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव सांगलीत त्यांच्या स्मारकासाठी व त्यांच्या नावे मुंबई येथील संशोधक प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्यात
- सम्यक वाडी पुणे येथे वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू
- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नमामि गोदावरी तेच आहे अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे .कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विशेष प्राधिकरण नेमण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधी देणार
- नाशिकमध्ये रामकाल विकास प्रकल्पांतर्गत रामकुंड , काळाराम मंदिर , खुदा तट परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने 146 कोटी दहा लाख रुपयांच्या किमतीची कामे हाती घेणार
- दुर्गम ते सुगम कार्यक्रमांतर्गत डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे 'धार्मिक स्थळे गड किल्ले व इतर निसर्गरम्य 45 ठिकाणे रोपवेद्वारे जोडण्यात येणार .
- राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धनव परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार
- महानुभव पंथाच्या श्रद्धास्थानांसाठी विकासाची कामे हाती घेण्यात येणार .
- प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथे श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू , तिथे दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाचे विचारात
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी कृत्रिम प्रवाह ,पाणबुडी पर्यटन यासाठी 75 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर
- कोयना नगर परिसर पातळ जी हा साताऱ्यात स्काय वॉकची उभारणी,नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण
- साताऱ्यातील जल पर्यटन प्रकल्प पर्यटकांसाठी खुला .खेळवत जिल्हा साताऱ्यात जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता
- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा कालवा उभारण्यात येणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
