Maharashtra Breaking News Live Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप चालू आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. आता अवघ्या काही जागांचा प्रश्न बाकी असून तोही लवकरच निकाली निघणार आहे. या जागावाटपानंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, राज्यातील घडामोडींचे हे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर.....
Santosh Shetty : संतोष शेट्टींनी दाखल केला उमेदवारी अर्ज, भिवंडू पूर्वमधून महायुतीचे उमेदवार
भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक: संतोष शेट्टी यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेने संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. आज मोठ्या शक्तीप्रदर्शनासह त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Girish Mahajan : पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार- गिरीश महाजन यांनी व्यक्त केला विश्वास
जळगाव जामनेर
रेकॉर्ड ब्रेक मतांनी जनता आपल्याला पुन्हा एकदा निवडून देईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे
राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत
अर्ज भरण्या साठी जाण्या पूर्वी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी त्यांचे औक्षण केले आहे























