Maharashtra News Live Updates : ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र, तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी खळबळ
Maharashtra News Live Updates 18 September 2024 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

Background
मुबंई : राज्यात गणरायाचे मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. राज्यात सध्या भावसाने दडी मारली आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका रत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात, संजय राऊत ,अनिल देसाई, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित
महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात
जागावाटपा संदर्भात महाविकास आघाडीची बैठक
संजय राऊत ,अनिल देसाई, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित
महाराष्ट्रातील जागावाटपा संदर्भात होणार बैठकीत चर्चा
ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र, तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी खळबळ
पिंपरी चिंचवड शहरात कायदा अन सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गणपती विसर्जनादिवशी तर एकाने थेट फिनिक्स मॉलच्या दिशेने गोळीबार केला तर दोघांनी एकाचा गळा चिरून खून केलाय. पत्नीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रियकराचा खून करण्यासाठी पती थेट बिहारहून पुण्यात आल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालंय. यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन खून आणि दोन ठिकाणी गोळीबारासह चोऱ्या-माऱ्यांच्या घटना घडल्यात. वाकडचे पोलीस निरीक्षक एस बी कोल्हटकर यांचे तर गुन्हेगारांवर कोणतीच पकड राहिली नसल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न व्हर्च्युअली सोडविण्याचा विडा हाती घेतलेले पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना वाकडमध्ये काय सुरुये याची कल्पना आहे की नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडलाय. अशातच हिंजवडी पोलिसांच्या हद्दीत बावधनमध्ये आणखी एक खुनाची घटना समोर आलीये. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांवर अनेकदा खरडपट्टी केलेली आहे. पण याचं पिंपरी चिंचवड पोलिसांना काही सोयरसुतक नसल्याचं दिसून येतंय. ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये घटनांनी हे अधोरेखित केलंय.























