![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे
स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपविण्यात आला होता. आता धमकीचा देखील तपास एटीएसकडे देण्यात आला आहे.
![Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे Maharashtra ATS probe into Mukesh Ambani threat case Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/26122451/Mukesh-Ambani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. घराबाहेरील गाडीत धमकीचं पत्र असून यामध्येअंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आली आहे.
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपविण्यात आला होता. आता धमकीचा देखील तपास एटीएसकडे देण्यात आला आहे.
तपास एनआयकडे सोपवण्याची फडणवीसांची मागणी
मनसुख हिरेन यांनी जबाबात म्हटलं आहे की, घरगुती वापराकरता ती मी गाडी विकत घेतली. त्याचं स्टेअरिंग जॅम झालं, त्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले? सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. जो या प्रकरणातला दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे. मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत असं कोणी आत्महत्या करत नाही. इतके योगायोग होत नाहीत. तात्काळ हे प्रकरण एनआयएकडे दिलं पाहिजे, असं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत असल्याचं सांगत कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले.
महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम
फडणवीस यांनी या प्रकरणात एनआयए चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या 'एटीएस'कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. परंतु, ही गाडी तिथे कोणी ठेवली यासंदर्भात अद्याप कळू शकलेलं नाही. अशातच पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असं त्यांचं नाव आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन काल रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)