एक्स्प्लोर

Saroj Ahire In Session : 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' सरोज अहिरेंची दुहेरी भूमिका, अडीच महिन्याच्या बाळाचं विधानभवनात पहिलं पाऊल

Saroj Ahire In Session : नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी चढली.

Saroj Ahire In Session : आजपासून नागपूरमध्ये (Nagpur) हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरवात झाली असून नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या (Deolali Assembly) राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. कारण अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी विधानभवनाची (Legislature) पायरी चढली असून आपल्यासाठी हा सुखदः क्षण असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik) देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात आल्या आहेत... त्यांचा अडीच महिन्याचा बाळ प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही.. म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या.. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत...मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे... तसेच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दल ही कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे.. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केलं आहे..

अडीच महिन्याचा प्रशंसक दिसला विधान भवन परिसरात
विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. 30 सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधीक सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अडीच महिन्याचा प्रशंसक विधानभवनातील राजकीय गोंधळापासून अलिप्त राहून आईच्या कुशीत निवांत झोपला होता...

आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, 
देशासह जगभरात अनेक महिला आहेत, ज्या दोन्ही गोष्टी सांभाळून आपले कर्तव्य निभावत आहेत. प्रशंसक हा केवळ अडीच महिन्यांचा असून  माझ्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून  त्याला इथे घेऊन आलेलो आहे, जेवढे शक्य असेल तेवढे अधिवेशन अटेंड करून मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी इथे आलेली आहे. स्वतःला नशीबवान समजेल आणि माझ्या बाळाला पण ती इतक्या पवित्र इमारतीमध्ये त्याचं पहिलं पाऊल म्हणजे घरातून त्याला पहिल्यांदाच बाहेर काढले  आहे. त्यानंतर तो थेट नागपूर समृद्धी महामार्गाने नागपूरला आलेला आहे. आज विधानभवन सारख्या ठिकाणी त्याचबरोबर नागपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये त्याचं पहिलं पाऊल आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जे कर्तव्य आहे, तो बजावणं आवश्यक आहे. ते कर्तव्य बजावण्यासाठी आली असून आई म्हणून जे कर्तव्य आहे, ते देखील पूर्ण करायचा असल्याचे मत आमदार सरोज अहिरे यांनी व्यक्त केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget