एक्स्प्लोर

सीमावादावर महाराष्ट्र सरकार प्रस्ताव पारित करणार, मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कर्नाटकपेक्षा दहापट अधिक प्रभावी असेल प्रस्ताव

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधातील ठराव गुरुवारी कर्नाटकच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाला होता.

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधातील ठराव गुरुवारी कर्नाटकच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही आक्रमक झाले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारही सीमावादावर प्रस्ताव आणणार आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. पुढील आठवड्यात सीमावादवर प्रस्ताव आणला जाणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक राज्यापेक्षा दहा पट अधिक प्रभावी असेल, असं देसाई यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव कर्नाटक सरकारने पारित केला होता. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिला. तसेच यावेळी भाषण करताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर टीका केली. 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा -

शंभूराज देसाई यांनी नागपूर येथे विधानमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,  ''राज्य सरकार सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर विस्तृत प्रस्ताव आणणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक सरकारपेक्षा दहा पट अधिक प्रभावी असेल."  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामते हा वाद चर्चेनं सोडवला जाऊ शकतो, असेही देसाई म्हणाले.  

आजच आणणार होतो प्रस्ताव -
आमचं सरकार सीमावादावर आजच प्रस्ताव पारित करणार होतं. पण भाजप आमदार मुक्ता टीळक यांच्या निधनामुळे हा प्रस्ताव पटलावर आणला नाही. सोमवारी हा प्रस्ताव पटलावर आणला जाणार आहे. हा प्रस्ताव कर्नाटक सरकारपेक्षाही दहापट अधिक प्रभावी असेल. तसेच हा प्रस्ताव मराठी लोकांच्या हिताचा असणार आहे. प्रस्ताव पारित झाल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेश करु न दिल्यामुळे केंद्राकडे नाराजी व्यक्त करणार आहोत, असे मंत्री देसाई यांनी सांगितलं.  

लवकरच बेळगावला जाणार -

तीन डिसेंबर रोजी मराठी भाषिक बांधवांना भेटण्यासाठी आम्ही बेळगावला जाणार होतो. नंतर तेथील काही बांधवांनी आम्हाला सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या कार्यक्रमात येण्याची विनंती केली.. मात्र, दुर्दैवाने कर्नाटक सरकारने आमच्या दौऱ्याला वेगळे वळण दिले. पोलीस बंदोबस्त वाढवत सीमेवरील चेक पोस्टवर नाकाबंदी केली. मराठी भाषिकांना नोटीसा दिल्या आणि त्यामुळे तणाव वाढला... अशा परिस्थितीत आमच्या जाण्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून आम्ही 6 डिसेंबरला तिकडे गेलो नाही... अधिवेशन संपलं की मी आणि चंद्रकांत दादा चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अधिकारीकरित्या कळवून बेळगावला जाणार आहोत, असे शंभूराज देसाई म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांचे खडेबोल; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांनी सुनावले; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
Embed widget