एक्स्प्लोर

Maharashtra Headlines 28th June : राज्यातील प्रमुख घडामोडी एका क्लिकवर, दुपारच्या बातम्या

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

Mumbai Rain : आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर 

2. वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 'हे' मोठे निर्णय

State Cabinet Meeting Todays Big Announcements : वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांचं नाव दिलं जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet Meeting) हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी न्हावा शेवा (Sewri–Nhava Sheva Sea Link) अटल सेतू असं नाव दिलं जाईल. एकंदरीत नामकरणांचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तर, राज्यात तब्बल 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. यासाठी 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

3. Jalgaon News : 'ताई, तू लढत राहा...' तिने ओवाळलं अन् आपसूक उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत आलं पाणी, जळगावातील 'तो' प्रसंग...   

Jalgaon Devendra Fadnavis : 'आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे,' हे उद्गार आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. जळगाव शहरात कार्यक्रमासाठी जात असताना देवेंद्र फडणवीस यांना 'मनोबल' या शाळेतील एका दिव्यांग मुलीनं पायाने ओवाळलं. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी ट्विटरवर पोस्ट करत तरुणीचे आभार मानले. वाचा सविस्तर 

4. IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांना बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhaji Nagar News : धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या सुनील केंद्रेकर यांनी (Sunil Kendrekar) स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती का घेतली यावरुन राजकीय, प्रशासकीय वर्तुळ तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. तर यावरुन आता राजकीय आरोप देखील सुरु झाले आहेत. तर केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नसून त्यासाठी त्यांना भाग पाडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. वाचा सविस्तर 

5. संभाजीनगर हादरलं! नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरु होते लैंगिक शोषण

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संतापजनक प्रकार समोर आला आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन दोन आरोपीविरुद्ध सोमवारी (26 जून) रात्री उशिरा कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे अशी आरोपींचे नावं असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. वाचा सविस्तर 

6. आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी आणि बकरी ईद (Bakra Eid) हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हिंसाचाराच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बैठकीत आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लीम बांधवांकडून कुर्बानी न करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी असे निर्णय घेण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार आणि बुलडाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget