एक्स्प्लोर

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

Mumbai Rain : सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. या पावसामुळं अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai Rain : आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परीणाम झाला आहे. ठाणे, मुंबई, दिवा, कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची कामामुळं ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी

वाहतूक कोंडी झाल्यामुळं रिक्षावाले आणि सामान्य नागरिक हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत आहेत. मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळं चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून कोणत्याच प्रकारचं नियोजन करण्यात आलं नाही. हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात सध्या दृश्य मानता कमी झाली असून पर्यटकांची गर्दी देखील कमी आहे. मुंबईसह उपनगरात आज जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. 

मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला

मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पावसाचा जोर ओसरल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत नाही. मात्र एलबीएस रोडवर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पूर्व उपनगराप्रमाणेच ठाण्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू असल्याने आणि दुसरीकडे अधून मधून जोरदार पाऊस पडत असल्याने या वाहतूक कोंडीतून मुंबईकर मार्गस्थ होत आहेत.

मागील तीन तासात मुंबईत पडलेल्या पावसाची आकडेवारी 

ठाणे - 50.04 मिमी 
कुलाबा - 54 मिमी 
दिंडोशी - 39 मिमी 
कासारवडवली - 44 मिमी 
डोंबिवली पश्चिम - 35 मिमी 
डोंबिवली पूर्व - 31 मिमी
मुंब्रा - 48  मिमी 
ऐरोली - 41 मिमी 
मुंबई विमानतळ - 38 मिमी

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्यात काही भागात जोरदार पाऊस, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह ठाण्याला यलो अलर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget