एक्स्प्लोर

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 'हे' मोठे निर्णय

वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आलं आहे. तसेच, भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

State Cabinet Meeting Todays Big Announcements : वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांचं नाव दिलं जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet Meeting) हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती आणि शिवडी न्हावा शेवा (Sewri–Nhava Sheva Sea Link) अटल सेतू असं नाव दिलं जाईल. एकंदरीत नामकरणांचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तर, राज्यात तब्बल 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. यासाठी 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याचा फायदा तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जलसंपदा विभागामार्फत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी करणारं पत्रं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकरांचं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली. 

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय :

  • वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
  • एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव
  • राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, 210 कोटीस मान्यता
  • भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. 2 कोटी कार्ड्स वाटणार आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
  • संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेची रक्कम 1000 रूपयांवरून 1500 रुपये 
  • आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.करोडो कामगारांना लाभ मिळणार
  • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)
  • मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता.
  • पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
  • मुंबई मेट्रो-3 मार्गासाठी धारावीचा भुखंड
  • भूखंडाच्या हस्तांतरणातील  अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
  • मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
  • राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
  • सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन  पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
  • बीडीडी चाळ पुनर्विकासातील  झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित 
  • जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 3552 कोटी खर्चास मान्यता
  • राज्यात 9 ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. 4365 कोटी खर्चास मान्यता 
  • बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
  • दीनदयाळ अंत्योदय योजना आता 143 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार
  • दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. 12 लाख विद्यार्थ्यांना लाभ
  • देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
  • चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
  • सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
  • गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
  • ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
  • पाकिस्तानने पकडलेल्या  मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget